मुलींचे वडील जगतात जास्त आयुष्य, मुलांच्या वडिलांचं काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 09:47 AM2019-12-23T09:47:27+5:302019-12-23T09:53:26+5:30

अभ्यासकांनी मुला-मुलींचा वडिलांच्या आरोग्यावर काय प्रभाव होतो हे जाणून घेण्यासाठी ४३१० लोकांचा डेटा एकत्र केला होता.

Study says Fathers of daughters live longer 74 years of age increases after every daughter is born | मुलींचे वडील जगतात जास्त आयुष्य, मुलांच्या वडिलांचं काय होतं?

मुलींचे वडील जगतात जास्त आयुष्य, मुलांच्या वडिलांचं काय होतं?

Next

(Image Credit : redbookmag.com)

आई-वडिलांच्या आयुष्यात आनंद घेऊन येण्यासोबतच मुली वडिलांच्या आयुष्यांचे काही वर्ष आणखी वाढवते. असा आमचा नाही तर पोलंडच्या जेगीलोनियन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, मुलींचे वडील हे ज्यांना मुली नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त आयुष्य जगतात. तसेच मुलगा झाला तर पुरूषाच्या आरोग्यावर काहीच फरक पडत नाही. पण मुलगी झाली तर वडिलांचं वय ७४ आठवडे अधिक वाढतं. जेवढ्या जास्त मुली तेवढं वडिलांचं वय अधिक वाढतं.

काय सांगतो रिसर्च?

युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी मुला-मुलींचा वडिलांच्या आरोग्यावर काय प्रभाव होतो हे जाणून घेण्यासाठी ४३१० लोकांचा डेटा एकत्र केला होता. यात २१४७ माता आणि २१६३ पिता होते. अभ्यासकांनी दावा केला आहे की, हा अशाप्रकारचा पहिलाच रिसर्च आहे. याआधी बाळाच्या जन्मानंतर आईच्या आरोग्यावर आणि वयावर काय परिणाम होतो, यावर रिसर्च करण्यात आले होते.

मुला-मुलीचा आईच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव

(Image Credit : decidetocommit.com)

युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनुसार, मुलींऐवजी मुलांना प्राथमिकता देणारे पिता आपल्या जीवनाचे काही वर्ष स्वत:च कमी करतात. घरात मुलीचा जन्म होणे वडिलांसाठी चांगली बातमी आहे. पण आईच्या आरोग्यासाठी नाही. याचं कारण म्हणजे याआधी करण्यात आलेल्या अमेरिकन जर्नल ऑफ ह्यूमन बायोलॉजीच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले होते की, मुलगा आणि मुलगी दोघांचाही आईच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो, ज्याने त्यांचं वजन कमी होतं. 

आधीच्या रिसर्चमधील दावा

(Image Credit : shriverreport.org)

याआधी झालेल्या एका रिसर्चमध्ये अविवाहित महिला विवाहित महिलांच्या तुलनेत अधिक आनंदी राहत असल्याचे समोर आले होते. पण दुसऱ्या एका रिसर्चमधून समोर आले होते की, बाळ झल्यानंतर आई आणि वडील दोघांचंही वय वाढतं. या रिसर्चमध्ये १४ वर्षापर्यंतचा डेटा घेतला गेला होता. यातून समोर आलं होतं की, लहान मुलांसोबत राहणारे कपल्स  मुलांसोबत न राहणाऱ्या कपल्सपेक्षा जास्त आनंदी राहतात आणि जास्त आयुष्य जगतात.


Web Title: Study says Fathers of daughters live longer 74 years of age increases after every daughter is born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.