तुमचा पार्टनर लाईफ पार्टनर होण्यासाठी योग्य आहे का? असं ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:28 PM2020-04-29T13:28:09+5:302020-04-29T13:32:07+5:30

लाईफपार्टनर कसा असावा किंवा आपण ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहोत. ती व्यक्ती लाईफ पार्टनर होण्यास योग्य आहे का हे माहीत असणं गरजेचं असतं. 

Relationship tips is your partner right for marriage myb | तुमचा पार्टनर लाईफ पार्टनर होण्यासाठी योग्य आहे का? असं ओळखा

तुमचा पार्टनर लाईफ पार्टनर होण्यासाठी योग्य आहे का? असं ओळखा

googlenewsNext

सध्या ऑफिस, कॉलेज, सगळ्याच ठिकाणी मुलामुलींचे स्वतःचे पार्टनर असतात. काहीजण सुरुवातीपासूनच एकाच व्यक्तीला आपला पार्टनर म्हणून स्वीकारतात, काहीवेळा नात्यात फसवणूकीचा सामना करावा लागतो, तर काहींना एखादया व्यक्तीसोबत तात्पुरतं रिलेशनशिप ठेवायला हवं, असं वाटतं. पण लाईफ पार्टनर कसा असावा किंवा आपण ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहोत. ती व्यक्ती लाईफ पार्टनर होण्यास योग्य आहे का हे माहीत असणं गरजेचं असतं. 

लग्न हा आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो. म्हणून नंतर पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा आधी विचार केलेला बरा. म्हणून आज आम्ही तुम्हाला तुमचा पार्टनर लाईफ पार्टनर होण्यासाठी योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं याबाबत सांगणार आहोत.

बोलण्याची पद्धत

पार्टनरशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यानंतर तुम्हाला समाधान झाल्यासारखं वाटत असेल किंवा तुमचा पार्टनर सुद्धा तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत असले तर असा पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे. कारण एकमेकांशी बोलून रिलॅक्स वाटणं किंवा एखाद्या समस्येवर, ताण-तणावावर उपाय शोधणं असं बॉंडिंग असेल तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात. तुम्हाला समजून घेणारी आणि योग्यवेळी योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर ती व्यक्ती लाईफ पार्टनर म्हणून तुमच्यासाठी योग्य आहे.

मान देणं

प्रत्येक नात्यात विश्वासाबरोबरच मान- सन्मान असणं सुद्धा तितकंच मह्त्वाचं असतं. लाईफ पार्टनर हा तुम्हाला मान देणारा असावा. तुमचा पार्टनर बोलताना किंवा वाद घालत असताना सुद्धा मान ठेवून बोलत असेल तर अशा पार्टनरचा तुम्ही लाईफ पार्टनर स्वीकार करण्यास काही हरकत नाही.  जर एखाद्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम असुनही अनेकदा तुम्हाला अपशब्द वापरणं, भांडणात टोकाची भूमिका घेणं असे प्रकार होत असतील तर असा पार्टनर तुमच्यासाठी योग्य नाही. ( हे पण वाचा-नातं तुटायला वेळ लागणार नाही, जर विवाहीत कपल्स करत असतील 'या' चुका)

तुमच्या स्वप्नांना महत्व देणं

 तुमचा पार्टनर स्वतःसोबतंच तुमच्या स्वप्नांचा सुद्धा विचार करणारा असावा स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मानसिक बळ देण्यापासून सगळ्या प्रकारे मदत करत असेल तर असा पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे. कारण समजून घेणारा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देणारा पार्टनर असेल तर तुम्हाला नात्यात कशाचीही कमतरता भासणार नाही.  ( हे पण वाचा-लॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार? 'असे' असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स)

Web Title: Relationship tips is your partner right for marriage myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.