Relationship: असे असतात एकतर्फी प्रेमाचे संकेत, वेळीच द्या लक्ष, अन्यथा येऊ शकते पश्चातापाची वेळ   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 02:57 PM2022-04-19T14:57:49+5:302022-04-19T14:58:18+5:30

Relationship Tips: असे खूप लोक आहेत जे आपल्या पार्टनरवर जीवापाड प्रेम करतात. मात्र त्यांना त्याच्या बदल्यात तेवढं प्रेम मिळत नाही ज्याचे ते हक्कदार असतात. आज आपण जाणून घेऊयात की तुमचं नातं एकतर्फी तर नाही ना, तसेच एकतर्फी रिलेशनशिपचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा याविषयी.

Relationship: These are the signs of one-sided love, pay attention in time, otherwise there may come a time of remorse | Relationship: असे असतात एकतर्फी प्रेमाचे संकेत, वेळीच द्या लक्ष, अन्यथा येऊ शकते पश्चातापाची वेळ   

Relationship: असे असतात एकतर्फी प्रेमाचे संकेत, वेळीच द्या लक्ष, अन्यथा येऊ शकते पश्चातापाची वेळ   

Next

नवी दिल्ली - काही लोकांना रिलेशन मॅनेज करणे खूप कठीण जाते. नात्यामध्ये बॅलन्सिंगची खूप गरज असते. आधीच्या काळी नाती खूप दीर्घकाळासाठी चालत असत, कारण तेव्हा लोकांना नाती मेन्टेंन करणे चांगल्या पद्धतीने जमत असे. मात्र आजच्या काळात नाती सांभाळणे लोकांसाठी खूप कठीण झाले आहे. असे खूप लोक आहेत जे आपल्या पार्टनरवर जीवापाड प्रेम करतात. मात्र त्यांना त्याच्या बदल्यात तेवढं प्रेम मिळत नाही ज्याचे ते हक्कदार असतात. आज आपण जाणून घेऊयात की तुमचं नातं एकतर्फी तर नाही ना, तसेच एकतर्फी रिलेशनशिपचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा याविषयी.

कुठल्याही नात्यामध्ये परस्परांवरील विश्वास, सन्मान आणि एकमेकांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. आपण आपल्या पार्टनरवर जेवढं प्रेम करतो तेवढंच आपल्या पार्टनरने आपल्यावर करावं अशी अपेक्षा असते. मात्र असं बऱ्याचदा होत नाही. अनेकजण आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात मात्र त्याच्या बदल्यात त्यांना प्रेम मिळत नाही. यालाच एकतर्फी प्रेम म्हटलं जातं. अशा परिस्थितीत तुम्ही काही पद्धतींमधून एकतर्फी प्रेमाचा शोध घेऊ शकता.

एकतर्फी प्रयत्न करणे - रिलेशनशिपमध्ये नेहमी कपल्स एक-दुसऱ्याला गिफ्ट्स देतात. सरप्राईज प्लॅन करतात. मात्र जर असं केवळ तुम्हीच तुमच्या पार्टनरसाठी करत असाल तर आणि तो तुमच्यासाठी काहीच करत नसेल तर समजून जा की तो तुमची रिलेशनशिप ही एकतर्फी आहे.

प्रायॉरिटी लिस्टमध्ये सामील न करणे - जर तुमचा पार्टनर दुसऱ्यांना तुमच्यापेक्षा जास्त प्राधान्य देत असेल आणि तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देत असेल तर तर समजून जा की तुम्ही एकरर्फी रिलेशनशिपमध्ये आहात. 

चूक झाल्यावर माफी न मागणे - प्रत्येक नात्यामध्ये रुसणे आणि समजावणे चालूच असते. मात्र एकतर्फी रिलेशनमध्ये केवळ एकाच व्यक्तीला समजावावे लागते. अनेकदा चूक नसतानाही एकाच व्यक्तीला माफी मागावी लागते.

असे दूर करा एकतर्फी रिलेशनशिपमधील प्रॉब्लेम 
पार्टनरशी बोला -

नेहमी लोक पार्टनरला नाराज होण्याच्या भीतीने काही बोलतच नाही. जर तुम्हाला तुमचं प्रेम एकतर्फी आहे असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही आत्मविश्वासाने तुनच्या पार्टनरशी बोला. कदाचित तुमचं म्हणणं ऐकल्यावर तो तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीने वागू लागेल. 

कुटुंब, मित्र आणि तज्ज्ञांची मदत घेणे -
जर तुम्हाला तुम्ही एकतर्फी रिलेशनशिपमध्ये आहात असे वाटत असेल तर अशा वेळी कुटुंबीय, मित्र आणि तज्ज्ञांची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला खूप मदत मिळेल. 

Web Title: Relationship: These are the signs of one-sided love, pay attention in time, otherwise there may come a time of remorse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.