नातं तुटायला वेळ लागणार नाही, जर विवाहीत कपल्स करत असतील 'या' चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:23 PM2020-04-21T12:23:23+5:302020-04-21T12:35:42+5:30

विवाहीत कपल्स नकळतपणे अशा चुका करूनआपलं चांगलं नातं बिघडवतात.

Mistakes that can ruin your happily married relationship myb | नातं तुटायला वेळ लागणार नाही, जर विवाहीत कपल्स करत असतील 'या' चुका

नातं तुटायला वेळ लागणार नाही, जर विवाहीत कपल्स करत असतील 'या' चुका

Next

सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे लोक घरीच बसून आहेत. अशात २४ तास त्याच व्यक्तीसोबत राहिल्यामुळे भांडण होण्याची शक्यता असते.  जे कपल्स एकमेकांपासून लांब आहेत. त्यांची भेट न झाल्यामुळे त्यांच्यात प्रेमाची भावना वाढण्याची शक्यता आहे. पण जे विवाहीत आहेत आणि आपल्या पार्टनरसोबत राहत आहेत. 

अशा कपल्समध्ये काही कारणांमुळे वाद होण्याची शक्यता आहे.  कारण लॉकडाऊनमुळे अनेकांची चिडचिड होत आहे. काहीलोक तो राग आपल्या पार्टनरवर काढतात.  इतरवेळी सुद्धा विवाहीत कपल्स चुका करतात आणि घटस्फोटापर्यंत गोष्ट जाते. आज आम्ही तुम्हाला रिलेशन का  तुटतं याची कारणं सांगणार आहोत.


पार्टनरबद्दल लोकांशी चर्चा

अनेकदा पार्टनरचं वागणं खटकल्यानंतर लोक आपल्या मित्र,मैत्रिणींना, नातेवाईकांना आपल्या पार्टनरच्या पटत नसलेल्या गोष्टी सांगतात. जर तुम्ही वाईट गोष्टी किंवा चुका लोकांना सांगत असाल तर तुम्हाला अनेकदा समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तशीच प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे तुमची पार्टनरबद्दल विचार करण्याची पध्दत नकारात्मक होऊ शकते. त्यातून वादाला तोंड फुटतं

एकमेकांच्या चुका  दाखवणं

भांडण होणं यात नवीन असं काहीही नसतं. पण प्रत्येकवेळी तुम्ही मागील चुका सतत पार्टनरला दाखवून देत असाल तर वाद वाढण्याची शक्यता असते. यासाठी आधी घडलेलं तेव्हाच विसरा. परत त्याच गोष्टी बोलून वाद वाढवू नका.

शांत न बसणं

एकावेळी दोघजणं एकमेकांना उलट बोलत भांडत असतील तर वाद वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी पार्टनर जर भांडत असेल तर तुम्ही शांत रहा. कारण एकच गोष्ट लांब खेचत राहिल्यामुळे तुमची इच्छा नसाताना सुद्धा राग ओढावून घ्यावा लागेल. तसंच कुठल्याही मुलीला किंवा मुलाला आपल्या कुटुंबियातील व्यक्तींना वाईट साईट बोल्लेलं आवडत नाही. तुम्ही पार्टनरसोबत वाद घालत असताना कुटुंबियाना कधीही मध्ये आणू नका. नेहमी सन्मानपूर्वक बोला.

इतरांशी तुलना करू नका

पार्टनरची इतरांशी तुलना करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे प्लस पॉईंट्स असतात. जरी तुम्हाला  पार्टनरची कोणती गोष्ट आवडली नाही तरी तुलना कधीही करू नका. त्यामुळे पार्टनरला  दुःख होण्याची शक्यता आहे. म्हणून आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी इतरांचे उदाहरण कधीही देऊ नका.

Web Title: Mistakes that can ruin your happily married relationship myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.