पार्टनरशी भांडताना चुकूनही बोलू नका या गोष्टी, जाणून घ्या कोणत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 05:06 PM2019-12-16T17:06:57+5:302019-12-16T17:13:20+5:30

प्रत्येक नात्यांमध्ये भांडण ही होतच असतात. कधी वागण्या बोलण्यातून तर वेगळ्या एखादया शुल्लक विषयावरून पती आणि पत्नीच्या नात्यात खटके उडत असतात.

know the things of ignorence while arguing with a partner | पार्टनरशी भांडताना चुकूनही बोलू नका या गोष्टी, जाणून घ्या कोणत्या

पार्टनरशी भांडताना चुकूनही बोलू नका या गोष्टी, जाणून घ्या कोणत्या

Next

प्रत्येक नात्यांमध्ये भांडण ही होतच असतात. कधी वागण्याबोलण्यातून तर वेगळ्या एखादया शुल्लक विषयावरून पती आणि पत्नीच्या नात्यात खटके उडत असतात. भांडण झालं की रूसवा, फुगवा येत असतो, त्याचप्रमाणे अबोला धरणे यांसारख्या गोष्टी होत असतात. पण कधीकधी रागाच्या भरात आपण आपल्या पार्टनरला जे बोलायचं नाही ते बोलून बसतो. मग भांडण टोकाला जातं. अशी परीस्थीती निर्माण झाल्यास पार्टनरच्यासमोर काही गोष्टी न बोलणंच फायदेशीर ठरतं. कारण काहीवेळा लहान लहान गोष्टींच रूपांतर मोठ्या वादात होतं. तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पार्टनरसमोर बोलणं टाळायला हवं. 

१) तुझी चूक आहे.


कधीही भांडण झाल्यानंतर सगळी तुझी चुकी आहे. तुझ्यामुळे आपलं भांडण झालं. असं म्हणू नका. कोणत्याही गोष्टीसाठी आपलया पार्टनरला जबाबदार धरू नका. भांडण झाल्यावर एकमेकांचा राग येणं स्वाभाविक आहे, पण त्यावेळी रागाच्या भरात कोणताही अपशब्द उच्चारू नका.

 
२)आपण वेगळे होऊ

जर कोणत्या व्यक्तीला तुम्ही तुमचा पार्टनर म्हणून स्वीकारता तेव्हा त्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायचं तुम्ही ठरवलेलं असतं. जर काही कारणाने तुमच्यात वाद झाले तर आपण एकत्र नको रहायला वेगळं होऊया असं पार्टनरला म्हणू नका. कारण तुम्ही रागाच्या भरात जर एखादा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला ही गोष्ट महागात पडू शकते.


३)स्वतःच बोलत राहणे

आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकून न घेता जर तुम्ही त्याला चुकीचं  ठरवत असाल तर ही बाब योग्य नाही . जर काही कारणामुळे तुमच्या नात्यात वाद निर्माण झाले असतील तर पार्टनरला सुध्दा बोलण्याची संधी द्या. समजून घ्या तुम्हाला काही गोष्टी मनावर घेण्यापेक्षा त्या इग्नोर करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रीया दिल्यामुळे अनेकदा भांडण आणखी वाढतं. 

Web Title: know the things of ignorence while arguing with a partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.