तुमचा पार्टनर तुमच्यावर खरं प्रेम करत असेल, तर तुम्ही खरचं नशीबवान आहात. कारण सध्याच्या काळात एक लॉयल पार्टनर मिळणं खरच खूप अवघड आहे. पार्टनर तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण तुमचा पार्यनर तुम्हाला फसवतोय हे जाणून घेणं मात्र फार कठिण आहे. कारण जर तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत असेल तर तो अनेक गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत याची काळजी घेत असतो. अशा व्यक्तीसोबत आयुष्य काढणं म्हणजे तुमची खरचं फसवणूकच आहे. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत आहे की, नाही हे जाणून घेणं सोपं होईल. 

पासवर्ड लपवणं

जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून तुमच्या फोनचा किंवा लॅपटॉपचा पासवर्ड लपवत असेल तर त्याचा अर्थ आहे की, तो नक्कीच तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. नक्कीच कोणतीतरी गोष्ट आहे जी तो तुमच्यापासून लपवत आहे. 

कोणत्याही प्रॉब्लेममध्ये तुमची साथ न देणं 

जर तुमचा पार्टनर संकटामध्ये तुमची साथ देत नसेल. तुमच्यावर आलेल्या वाईट प्रसंगातही तो जर इग्नोर करत असेल तर त्याला तुमच्याबाबत अजिबात आपुलकी वाटत नाही. अनेकदा तुमचा पार्टनर तुमच्या समस्या आणखी वाढवतो. अशातच तो तुमची साथ कधीही सोडू शकतो. 

तुमच्याशी भावनिकदृष्ट्या जवळीकता नसणे

जर तुमचा पार्टनर तुमच्याशी फक्त शारीरिक जवळकता ठेवत असेल आणि मानसिकरित्या किंवा भावनिकदृष्ट्या तुमच्याशी जोडलेला नसेल तर तुमचा पार्टनर तुमच्याशी अजिबात प्रेम करत नाही. 

नातं लपवणं 

अनेकजण आपलं नातं इतर लोकांपासून लपवतात. पण जर तुम्ही सतत सांगूनही तो तुमचं नातं लपवत असेल तर मात्र तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. तुम्ही नातं इतरांपासून लपवण्याचं कारण तुमच्या पार्टनरलाही स्पष्टपणे विचारू शकता.
 
(टिप : वरील गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी वरील कारण तंतोतंत खरी असतीलच असं नाही.)

Web Title: know the 4 signs of wrong partner in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.