Fathers day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 11:06 AM2019-06-15T11:06:47+5:302019-06-15T11:10:20+5:30

'मदर्स डे'प्रमाणे वर्षातून एक दिवस असा येतो की, जो फक्त वडिलांसाठी साजरा केला जातो. 'फादर्स डे' प्रत्येक वर्षात जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. त्यामुळे यावर्षी फादर्स डे 16 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे.

Fathers day 2019 date significance history why and how to celebrate | Fathers day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे'

Fathers day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे'

Next

(Image Credit : Expansión)

'मदर्स डे'प्रमाणे वर्षातून एक दिवस असा येतो की, जो फक्त वडिलांसाठी साजरा केला जातो. 'फादर्स डे' प्रत्येक वर्षात जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. त्यामुळे यावर्षी फादर्स डे 16 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी आपल्या वडिलांना खूश करण्यासाठी त्यांच्यासाठी कार्ड तयार करतात, गिफअट देतात. वडिल प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक थॅंक्स तर बनतचं. त्यामुळे फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांना खूश करण्यासाठी तुम्हीही काहीतरी नक्की करा. पण तुम्हाला माहीत आहे का? फादर्स डेची सुरुवात नक्की कधी, कुठे आणि कशी झाली? 

पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला फादर्स डे?

पहिल्यांदा 1908मध्ये वेस्ट वर्जिनियामध्ये फादर्स डे साजरा करण्यात आला होता. वेस्ट वर्जिनियामध्ये त्यावेळी एक वाईट घटना घडली होती. एका कोळश्याची खाण अचानक खचली आणि या दुर्घटनेमध्ये तेथील जवळपास 200 पादरी म्हणजेच चर्चमधील फादर्स मृत्यूमुखी पडले. 

दुर्घटनेनंतर रविवारी प्रार्थना सभेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. हा रविवार जून महिन्यातील तिसरा रविवार होता. या प्रार्थना सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की, प्रत्येक वर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करून  सर्व फादर्सना श्रद्धांजली देण्यात येईल. त्यानंतर वेस्ट वर्जिनियामध्ये काही वर्षांसाठी जूनच्या तिसऱ्या रविवारी फआदर्स डे साजरा करण्यात आला, पण तो इंटरनॅशनल इव्हेंट होऊ शकला नाही. 

(Image credit : Medium)

अनेक वर्षांनंतर 1909मध्ये अमेरिकेतील एका सिविल वॉरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एका शिपायाची मुलगी सोनारा मार्ट डौड हिने जूनच्या तिसरा रविवार फादर्स डेच्या रूपात साजरा करण्याचा आग्रह केला. कारण याच तिवशी तिचे वडिल देशासाठी लढता लढता शहिद झाले होते. 1913मध्ये अमेरिका सरकार समोर फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. आणि काही वर्षांनी 1972मध्ये अमेरेकी सरकारने जूनचा तिसरा दिवस सुट्टीचा दिवस घोषित करून फादर्स डे म्हणून साजरा करावा असे घोषित केले. 

Web Title: Fathers day 2019 date significance history why and how to celebrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.