ब्रेकअपनंतर चुकूनही सोशल मीडियावर करू नका 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 02:32 PM2020-01-28T14:32:41+5:302020-01-28T14:35:53+5:30

कोणत्याही कपल्सचं ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला सांभाळण कठिण होऊन बसतं.

Dos and donts of social media after a breakup | ब्रेकअपनंतर चुकूनही सोशल मीडियावर करू नका 'या' गोष्टी

ब्रेकअपनंतर चुकूनही सोशल मीडियावर करू नका 'या' गोष्टी

googlenewsNext

कोणत्याही कपल्सचं ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला सांभाळणं कठिण होऊन बसतं. कारण याच कालावधीत आपण काही चुका सुद्धा करत असतो. ज्यात सोशल मीडियाचा वापर करून आपल्या ब्रेकअप झालेल्या पार्टनरकडे वॉच ठेवणं हे खूपचं कॉमन आहे. आपला पार्टनर किंवा आपली पार्टनर कुठे जात आहे, कोणाला भेटत आहे, सोशल मीडियावर काय पोस्ट करत आहे. या गोष्टींमध्ये आपल्याला खूपच इंटरेस्ट असतो. म्हणूनच आपण तिच्या फेसबूक पेजला जाऊन अपलोड आणि स्टोरीज् चेक करत असतो. 

Image result for COUPLES BREAK UP

इंग्लंडमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार जितका वेळ आपण सोशल मिडीयावर असतो. तितका वेळ आपण ताण-तणावाखाली असतो. कारण जितका वेळ आपण आपल्या एक्सच्या फेसबूकपेजसाठी देत असतो. तितका वेळ आपण मानसीकदृष्ट्या तणावाखाली असतो. त्यामुळेच आपल्याला त्या नात्यांमधून बाहेर पडणं कठिण होतं. ब्रेकअपनंतर आपण एक्स सतत विचार आणि एक्सच्या सोशल मिडीयाकडे लक्ष ठेवून असल्यामुळे give up  करू शकतं नाही.  अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवत असतात. ज्या आपल्या मानसीक आरोग्यासाठी चांगल्या नसतात आज आम्ही  तुम्हाला ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियावर कसं रिएक्ट करायचं हे सांगणार आहोत. 

Image result for COUPLES BREAK UP(Image credit- the morden man)

सोशल मीडियावर स्टॉक करणं

सगळ्यात आधी तुम्ही सोशल मिडीयावर आपल्या पार्टनरला स्टॉक करणं सोडा.  तुम्ही एक्सच्या  फेसबूक अकाऊंटला अनफॉलो किंवा ब्लॉक सुद्धा करू शकता. कारण तुम्ही कामात व्यस्त असताना तुमचं लक्ष तिच्याकडे जाणार नाही.  कारण त्यामुळे  तुम्ही ज्या गोष्टी पाहायला नको त्या पण पाहत असता. मग डिस्टर्ब होता.  
 ऑनलाईन स्टेटस पोस्ट करू नका.

Image result for COUPLES BREAK UP(image credit- carausal)

ब्रेकअप झाल्यानंतर कॉमन गोष्ट म्हणजे आपण आपल्या एक्ससाठी सॅड स्टेटस ठेवत असतो.  किंवा आपला राग काढण्यासाठी आपण काहीही पोस्ट करत असतो. असं केल्याने आपण मानसीकरित्या अजून डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळे  जर तुम्हाला तुमच्या एक्सला काही बोलायचं किंवा राग काढायचा असेल तर भेटून बोला. सोशल मीडीयाचा वापर करू नका.

एक्सच्या नवीन पार्टनरशी मैत्री करू नका.

Related image
(image credit- insider.com)

एक्सच्या नवीन पार्टनरशी जर तुम्ही बोलायला गेलात किंवा मैत्री केलीत तर समस्या अधिक होण्याची शक्यता असेल कारण तुमचं मन त्यातच गुंतलेलं राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतर जर तुम्हाला तणावमुक्त राहायचं असेल तर  एक्सच्या नवीन पार्टनरशी मैत्री करू नका. (हे पण वाचा-म्हणून गर्लफ्रेंड तुमचा फोन चेक करते, जाणून घ्या फोन चेक करण्यापासून रोखण्याचा खास फंडा....)

एक्सच्या पोस्टला इग्नोर करा

Related image(image credit- elitedaily.com)

ब्रेकअप झाल्यानंतर  जर तुमची एक्स तुम्हाला राग येईल किंवा आठवण येईल असे इमोशनल पोस्ट टाकत असेल तर त्याकडे फारसं लक्ष देऊ नका. कारण  जर तुम्हाला 100 टक्के विश्वास असेल कि पार्टनरने पोस्ट तुमच्यासाठीच टाकलेली आहे. जर दुर्लक्ष करा. आणि सिंन्गल लाईफ इन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. ब्रेकअपनंतर तुम्ही ऑनलाईन डेटींग सुद्धा करू शकता. कारण  नंतर जर तुम्हाला तुम्ही पार्टनरचा अपमान करत आहात असं वाटत असेल तर असा विचार मनात येऊ देऊ नका. ( हे पण वाचा-लव्ह बाइट चारचौघात चर्चेचा विषय ठरू नये असं वाटत असेल, तर वापरा 'या' खास टिप्स!)

Web Title: Dos and donts of social media after a breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.