सध्याच्या काळात नातं तुटायला फारसा वेळ लागत नाही. तसेच नात्यामध्ये खटके उडण्यासाठी एकच गोष्ट नाहीतर अनेक विविध कारण कारणीभूत ठरतात. यांपौकीच एक कारण म्हणजे, अनेकदा मुली आपल्या नात्यातील छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करतात. तसेच त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायची एवढी सवय होते की, त्या आपल्या बॉयफ्रेंडबाबत प्रत्येक गोष्ट मैत्रिणीला सांगायला सुरुवात करतात. प्रत्येक गोष्ट शेअर करण्यामध्ये त्यांना फारसं काही वाटत नाही. पण मुलांना मात्र अशा गोष्टी आवडत नाहीत. तरिही प्रेमापोटी ते अनेकदा या गोष्टी इग्नोर करतात. पण अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या मुलं अजिबात सहन करू शकत नाहीत. जाणून घेऊया नात्यातील अशा काही गोष्टी ज्या मुलांना अजिबात कोणासोबतही शेअर करायला आवडत नाही. त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. 

पार्टनरचा पगार 

चुकूनही आपल्या पार्टनरचा पगार आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करू नका. मुलांना ही गोष्ट अजिबात आवडत नाही. अनेकदा मुलं या गोष्टीमुळे फार चिडतात. त्यांना अजिबात आवडत नाही की, त्यांचा पार्टनर त्यांच्यातील गोष्टी इतरांना जाऊन सांगतो. 

पार्टनरची इनसिक्योरिटी 

अनेकदा आपला पार्टनर एखाद्या गोष्टीमुळे इनसिक्योर असतो. किंवा एखाद्या गोष्टीची त्यांना फार भिती वाटत असेल तर त्या गोष्टी कोणाला सांगू नका. अनेकदा मुली अशा गोष्टी मैत्रिणींना सांगून मोकळ्या होतात. पण मुलं या गोष्टींना फार महत्त्व देतात. तुम्ही अशा गोष्टी एकमेकांना सांगितल्या तर तुम्ही त्यांना महत्त्व देत नाही असं वाटतं. त्यामुळे अशा गोष्टी कोणालाही सांगणं टाळा. 

इंटिमेसी  

तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमधील खासगी गोष्टी आपल्या मैत्रिणीसोबत अजिबात शेअर करू नका. ते तुम्हा दोघांमधील खासगी क्षण असतात. मुलांना अशा गोष्टी शेअर करायला अजिबात आवडत नाही. असं केलं तर त्यांना राग येऊ शकतो. आणि त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो.
 
तुमच्या नात्यामधील काही खासगी गोष्टी किंवा पार्टनरबाबतच्या काही गोष्टी कोणालाही सांगणं टाळा. या गोष्टींचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होतो. इतरांमुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येइल अशा गोष्टी अजिबात करू नका. 

( टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.) 


Web Title: Do not tell your friend these things of your boyfriend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.