जाकादेवी येथे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:33 AM2021-09-19T04:33:29+5:302021-09-19T04:33:29+5:30

रत्नागिरी/जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव - जाकादेवी बाजारपेठेत १९ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीला ...

Youth commits suicide at Jakadevi | जाकादेवी येथे युवकाची आत्महत्या

जाकादेवी येथे युवकाची आत्महत्या

Next

रत्नागिरी/जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव - जाकादेवी बाजारपेठेत १९ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीला आला. दीपक अनंत रहाटे असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक अनंत रहाटे याच्या वडिलांचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाले. ताे आणि त्यांच्या दाेन आईंसाेबत घरात चांगल्याप्रकारे राहत होते. नेहमीप्रमाणे दीपकने शुक्रवारी रात्री जेवण केले. जेवण केल्यानंतर तो आपल्या खाेलीत झोपायला गेला. सकाळी ५.३० वाजता त्याची आई खाेलीत गेली असता दीपकने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले. मुलाचा मृतदेह समाेर पाहताच आईने हंबरडाच फाेडला.

आत्महत्येची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दीपकने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे कारण समजू शकलेले नाही. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य हे करत आहेत. यासाठी खालगाव बीट अंमलदार किशोर जोशी मदत करत आहेत.

------------------------------

अभिनय क्षेत्राची आवड

दीपकचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याला अभिनय क्षेत्राची प्रचंड आवड होती. अनेक छोट्या-मोठ्या शॉर्ट फिल्ममधून त्याने आपली कला प्रदर्शित केली होती. दीपक हा सुस्वभावी व प्रेमळ होता. तसेच ताे खूप कष्टाळू होता. वडिलांच्या काजू व्यवसायात तो आवडीने मदत करत असे.

Web Title: Youth commits suicide at Jakadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.