तुमची वीजच नको मोहीम, वीजमाफीसाठी मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 02:05 PM2020-11-21T14:05:27+5:302020-11-21T14:07:08+5:30

mahavitran, mns, counsumar, ratnagirinews अनेक वर्षापासूनचे भाडे व नुकसान भरपाईची रक्कम महावितरणने ग्राहकांना व्याजासहीत तत्काळ द्यावी. अन्यथा वीज ग्राहकांनी केलेल्या मागणीप्रमाणे वीजमीटर काढण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणला निवेदन देऊन करण्यात आली आहे. शासनाने वीजबिल माफ न केल्यास तुमची वीजच नको ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

You don't want electricity, MNS agitation for power amnesty | तुमची वीजच नको मोहीम, वीजमाफीसाठी मनसेचे आंदोलन

तुमची वीजच नको मोहीम, वीजमाफीसाठी मनसेचे आंदोलन

Next
ठळक मुद्देतुमची वीजच नको मोहीम, वीजमाफीसाठी मनसेचे आंदोलनभाडे, नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ द्या

रत्नागिरी : अनेक वर्षापासूनचे भाडे व नुकसान भरपाईची रक्कम महावितरणनेग्राहकांना व्याजासहीत तत्काळ द्यावी. अन्यथा वीज ग्राहकांनी केलेल्या मागणीप्रमाणे वीजमीटर काढण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणला निवेदन देऊन करण्यात आली आहे. शासनाने वीजबिल माफ न केल्यास तुमची वीजच नको ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के जनता मजुर व शेतकरी आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात तीन ते चार महिन्यांची वीजबिल माफी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलने करण्यात आली. मात्र तरीही शासनासह कंपनीचे डोळे न उघडल्याने एक तर वीजबिल माफी द्यावी, अन्यथा ज्या जमीनदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा वापर विजेचे खांब, वीज वाहिन्यांसाठी झाला आहे. अशा जमीनदार शेतकऱ्यांना भाडे व नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी सातत्याने करण्यात आली आहे. वीजबिल माफी दूर सवलत देण्यास शासनाने नकार दिला आहे.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर, रत्नागिरी-लांजा तालुकाध्यक्ष सचिन साळवी, राजापूर तालुकाध्यक्ष राजेश पवार, रत्नागिरी शहराध्यक्ष सतीश राणे, रुपेश जाधव, सदानंद प्रीत, छोटू खामकर, उपतालुकाध्यक्ष राजू पासकोडे, दयानंद मिस्त्री, पुरुषोत्तम कांबळे, योगेश चिले, मनोज देवकर, आनंद शिंदे, सिध्देश धुळप, अमोल श्रीनाथ, मयुरेश मडके, सर्वेश जाधव, नयन पाटील, अमोल शिंदे, अक्षय माईन, मंदार राणे, जया डावर उपस्थित होते.

Web Title: You don't want electricity, MNS agitation for power amnesty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.