हर्णै बंदराचा कायापालट करणार : अब्दुल सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 05:25 PM2021-03-06T17:25:18+5:302021-03-06T17:27:22+5:30

Harnai port Abdul Sattar Ratnagiri - दापोली तालुक्यातील हर्णै बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच आंजर्ले येथे ग्रायन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही बंदरे, विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मुंबई येथील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

Will transform Harnai port: Abdul Sattar | हर्णै बंदराचा कायापालट करणार : अब्दुल सत्तार

हर्णै बंदराचा कायापालट करणार : अब्दुल सत्तार

Next
ठळक मुद्देहर्णै बंदराचा कायापालट करणार : अब्दुल सत्तारआंजर्लेत बंधारा बांधण्याची मच्छीमार बांधवांची मागणी

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील हर्णै बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच आंजर्ले येथे ग्रायन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही बंदरे, विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मुंबई येथील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला आमदार योगेश कदम, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, नियोजन अधिकारी बढीए तसेच मच्छीमार संघटनेचे सोमनाथ पावशे, हेमंत चोगले, बाळकृष्ण पावशे, दत्ताराम पेढेकर, पी.एन. चोगले, काशिनाथ पावशे, गोपीचंद चोगले उपस्थित होते.

अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै हे प्रमुख बंदर आहे. या बंदराचा विकास झाल्यास मच्छीमार बांधवांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पावसाळ्यात वादळापासून बोटींच्या संरक्षणासाठी तेथे सुविधा तयार करण्यात येतील. याबाबत आमदार योगेश कदम आणि मच्छीमार बांधवांनी मागणी केली होती.

आंजर्लेत बंधारा हवा

बोटी लावण्यासाठी सध्या मच्छीमार बांधवांना आंजर्ले खाडीमध्ये जावे लागते. या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने अपघात होतात. तेथेही बंधारे बांधण्याची मागणी मच्छीमार बांधवांनी केली.

Web Title: Will transform Harnai port: Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.