मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 06:12 PM2020-11-09T18:12:26+5:302020-11-09T18:15:15+5:30

Neet, educationsector, madrasha, ratnagiri, exam, शिक्षणाची ओढ असली की ती कसंही घेता येतं. कडवईच्या उजमाने हाच आदर्श दिला. मदरशामध्ये राहून धार्मिक शिक्षण घेतानाच तिनं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिली आणि ते फक्त स्वप्न न ठेवता सत्यात आणण्यासाठीचा प्रवासही सुरू केला. त्यासाठी नीट परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळवून तिनं या स्वप्नांच्या प्रवासाचा पहिला टप्पाही गाठला.

Ujma, who was studying in a madrassa, got special quality in the exams | मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ता

मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ता

Next
ठळक मुद्देमदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ताप्रसुती तज्ज्ञ डॉक्टर होण्याचे ध्येय

मेहरुन नाकाडे

रत्नागिरी : शिक्षणाची ओढ असली की ती कसंही घेता येतं. कडवईच्या उजमाने हाच आदर्श दिला. मदरशामध्ये राहून धार्मिक शिक्षण घेतानाच तिनं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिली आणि ते फक्त स्वप्न न ठेवता सत्यात आणण्यासाठीचा प्रवासही सुरू केला. त्यासाठी नीट परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळवून तिनं या स्वप्नांच्या प्रवासाचा पहिला टप्पाही गाठला.

धार्मिक शिक्षण घेतानाच शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा मनोदय कडवई (ता. संगमेश्वर) येथील उजमा नुरी या विद्यार्थिनीने पालकांकडे व्यक्त केला. तिने दहावी, बारावी पूर्ण करुन नीटची परीक्षा दिली. नीट परीक्षेत ७२० पैकी ६०१ (९८.०६ टक्के) गुण मिळवले. कष्ट, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर उजमाने हे यश मिळवले आहे.

कडवई येथील मदरशामध्ये उजमाचे वडील महमद तैय्यब खान व आई मैमुना विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. उजमा व तिची अन्य दोन भावंडेही याच मदरशात शिक्षण घेतात. उजमाची धार्मिक शिक्षणातील प्रगती चांगली होती. त्यामुळे एकाचवेळी दहावी व धार्मिक शिक्षणातील ह्यआलिमाह्णची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने दहावीत ७९ तर आलिमा परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले.

दहावी परीक्षेत चांगले गुण प्राप्त झाल्याने तिने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर माखजन येथील अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीला तिने ७४ टक्के गुण मिळवले. बारावी परीक्षेची तयारी करत असतानाच ह्यनीटह्णची परीक्षा दिली. उजमा या परीक्षेत उत्तीर्ण तर झाली मात्र पुरेशी गुणवत्ता नसल्याने तिला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला असता. आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नसल्याने तिने पुन्हा नीट परीक्षा देण्याचे निश्चित केले.

नीट परीक्षेसाठी उजमाने कोणताही क्लास लावला नव्हता. मात्र, इंटरनेट व ह्ययू ट्यूबह्णच्या माध्यमातून अभ्यासावर भर दिला. दररोज १४ ते १५ तास अभ्यास वर्षभर केला. त्याचे फळ तिला मिळाले असून, तिने नीट परीक्षेमध्ये ९८.०६ टक्के गुण मिळवले आहेत. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी तिला आता सहज शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, हे नक्की!

प्रसुती तज्ज्ञचे ध्येय

मुस्लिम समाजात प्रसुती तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे प्रसुती तज्ज्ञ होण्याचे उजमाचे ध्येय आहे. समाजातील गोरगरीब महिलांचे आजार व त्यावरील उपचार यासाठी काम करण्याची मनिषा असल्याचे उजमाने सांगितले. आई-वडिलांचे पाठबळ व आशिर्वाद यामुळेच यश संपादन केले असल्याचे सांगितले.

Web Title: Ujma, who was studying in a madrassa, got special quality in the exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.