राजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 PM2021-05-08T16:35:57+5:302021-05-08T16:37:00+5:30

Crimenews Ratnagiri : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने वडवली (ता. राजापूर) येथील प्रणील बळीराम चव्हाण यांच्या घरी छापा टाकून सिंगल बॅरल बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त केली. या प्रकरणी प्रणील चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Thirteen cartridges with guns seized in Rajapur | राजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त

राजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त

Next
ठळक मुद्देराजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्तराजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रत्नागिरी : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने वडवली (ता. राजापूर) येथील प्रणील बळीराम चव्हाण यांच्या घरी छापा टाकून सिंगल बॅरल बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त केली. या प्रकरणी प्रणील चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये घडलेल्या घटनांमधून बेकायदेशीर आणि विनापरवाना हत्यारांच्या वापरामुळे जीवितहानी झाली आहे़, त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या घटनांकडे लक्ष देऊन विनापरवाना बंदुकीचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. ६ मे रोजी वडवली येथे कारवाई केली.

त्यामध्ये चव्हाण यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सिंगल बॅरल बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अमोल भोसले यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत.

 

Web Title: Thirteen cartridges with guns seized in Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.