ठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं, नितेश राणे संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 06:04 PM2021-06-06T18:04:06+5:302021-06-06T18:11:12+5:30

Politics Nitesh Rane : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्याची तक्रार नितेश राणे यांनी केली आहे.

Thackeray government shameless, Konkani man left to the winds, Nitesh Rane angry | ठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं, नितेश राणे संतप्त

ठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलं, नितेश राणे संतप्त

Next
ठळक मुद्देठाकरे सरकार निर्लज्ज, कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडलंभाजपचे नेते नितेश राणे संतप्त, तुंटपूज्या मदतीवर साधला निशाणा

सिंधुदुर्ग : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या नुकसानी भरपाई घोषित केली पण नुकसानग्रस्तांना मिळालेली रक्कम अपूर्ण असल्याची तक्रार नितेश राणे यांनी केली आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोकण दौरा केला परंतु सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई "खोदा पहाड निकला चुहा" अशा प्रकारची नुकसान भरपाई आमच्या कोकणाला महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे .जिथे मच्छिमारांच लाखोंचं नुकसान झालेलं आहे, तिथे फक्त 50 हजार पर्यतची मदत केली.

हेक्टरी 50 हजार मदत देणार असल्याचे सरकारने सांगितले आहे, म्हणजे एका आंब्याच्या झाडाला 500 रुपये तर नारळाच्या झाडाला 250 रुपये , टपरीला 10 हजार रुपये , एवढे सगळे आकडे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा खर्च तरी एवढा आहे का ? जी काही कोकणाला मदत केली आहे. मग हे पंचनामे कशासाठी केले आमची आमची थट्टा करण्यासाठी की मजाक उडवण्यासाठी झाले.

एका बाजूला लाखोंची करोडोंची नुकसान झालेले आहे.निर्लज्जपणे केंद्राकडे दोन हजार कोटी मागायचे आणि इथे फक्त अडीच कोटी रुपये द्यायचे असं हे निर्लज्ज ठाकरे सरकार निर्लज्ज आहे. कोकणी माणसाला अक्षरशा वाऱ्यावर सोडले आहे, असेही राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टिका केली आहे.

Web Title: Thackeray government shameless, Konkani man left to the winds, Nitesh Rane angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.