Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:49 PM2019-10-05T13:49:03+5:302019-10-05T13:58:21+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.

Shiv Sena in Ratnagiri District - Phone from Matoshree for BJP's Manmoila | Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोन

Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोन

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना - भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोनजिल्हाध्यक्षांशी चर्चा, भाजप-शिवसेना कोअर कमिटीची आज बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये रुसवे फुगव्यांचे वातावरण आहे. काही जणांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ते बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, तर काही जण प्रचारात सहभागी होणार नाहीत, असे चित्र होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा कमिटी यांच्यासोबत समन्वय राखला गेला पाहिजे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी स्थापन करण्याची सूचना अ‍ॅड. पटवर्धन यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत त्या दृष्टीने लक्ष घालण्याचे आश्वासन पटवर्धन यांना दिले. त्यामुळे पुढील दोन आठवडे प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये सुयोग्य समन्वय राखला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करायचे आहे. त्यामुळेच काही जागांवर शिवसेनेने व रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने माघार घेतली आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होण्याकरिता भाजपची साथ आवश्यक आहे. यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यात संभाषण झाले, असे थेट बोलणे झालेले अ‍ॅड. पटवर्धन हे भाजपचे पहिले जिल्हाध्यक्ष ठरले.

पूर्वीच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला रत्नागिरी व गुहागरची जागा मिळत होती. या दोन्ही जागांवर यशही मिळत होते. रायगड, पुण्यातील सर्व जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना लढवत असल्याचे सांगण्यात आले.

नेते, उमेदवार बैठकीत

रत्नागिरीत आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपचे जिल्हास्तरावरील महत्त्वाचे दहा पदाधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, योगेश कदम आणि राजन साळवी हे बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Shiv Sena in Ratnagiri District - Phone from Matoshree for BJP's Manmoila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.