Sexual abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा, विवाहित तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा, विवाहित तरुणाला अटक

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा, विवाहित तरुणाला अटक

खेड : तालुक्यातील सोनगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी त्याच गावातील रोशन खेराडे या तरुणाला बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

ही घटना मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रोशन खेराडे हा पीडित अल्पवयीन मुलीच्या वाडीत राहतो. तो विवाहित असून, त्याची पत्नी गर्भवती आहे. मंगळवारी पीडित मुलगी घरात एकटी होती. ती शेजारच्या काकूंकडे गेली होती. असताना रोशन तिच्या घरात शिरून लपून बसला होता.

थोड्यावेळाने ती परत आल्यावर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि कोणालाही न सांगण्याची धमकीही दिली. संध्याकाळी त्या मुलीचे पालक घरी आल्यानंतर तिने घडलेली सर्व हकीकत आई - वडिलांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीचे पालक आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर खेड पोलिसांनी रोशन खेराडे याला ताब्यात घेतले.

पीडित मुलीच्या तक्रारीनुसार खेराडे याच्यावर भादंवि कलम ३७६, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गेल्याच आठवड्यात खेडमधील खोपी गावात अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठवडाभरातील ही दुसरी घटना असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Sexual abuse of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.