चिपळुणात शिकारीसाठी निघालेल्या सातजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 02:27 PM2020-10-19T14:27:22+5:302020-10-19T14:34:19+5:30

crimenews, hunting, ratnagirinews विनापरवाना बंदूक घेऊन दोन गाड्यातून जंगली प्राण्यांची शिकार करण्यास निघालेल्या तरुणांना शनिवारी मध्यरात्री २ वाजता चिपळूण शिरवली -मिरवणे रस्त्यावर चिपळूण पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून विनापरवाना २ बंदूक, २ चारचाकी वाहने, बॅटरी, जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीनजण फरार झाले असून, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

Seven arrested for hunting in Chiplun | चिपळुणात शिकारीसाठी निघालेल्या सातजणांना अटक

चिपळुणात शिकारीसाठी निघालेल्या सातजणांना अटक

Next
ठळक मुद्देचिपळुणात शिकारीसाठी निघालेल्या सातजणांना अटक१० जणांवर गुन्हा दाखल, तीनजण फरार, चिपळूण पोलिसांची कारवाई

अडरे : विनापरवाना बंदूक घेऊन दोन गाड्यातून जंगली प्राण्यांची शिकार करण्यास निघालेल्या तरुणांना शनिवारी मध्यरात्री २ वाजता चिपळूण शिरवली -मिरवणे रस्त्यावर चिपळूण पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून विनापरवाना २ बंदूक, २ चारचाकी वाहने, बॅटरी, जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीनजण फरार झाले असून, ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री चिपळूण पोलीस गस्तीवर असताना चिपळूण येथील शिरवली - मिरवणे बायपास मार्गावर मध्यरात्री २ वाजता एका बोलेरो पिकअप गाडीतून काही तरुण जंगल परिसराकडे जात होते. त्यांची गाडी अडवून पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना २२ हजाराची १२ बोअरची डबल बॅरल बंदूक आढळली. त्याचबरोबर ३६० रुपये किमतीची जिवंत काडतुसे, १०० रुपये किमतीची बॅटरी आढळून आली. विनापरवाना बंदूक घेऊन हे तरुण जंगली प्राण्यांची शिकार करण्यास निघाले होते, असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.

पोलिसांनी नीलेश अशोक लाड (३२), राजेश सत्यवान लाड, तेजस सत्यवान लाड आणि यश या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. नीलेश लाड याला अटक करण्यात आली असून, अन्य तिघेजण तेथून पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून बोलेरो पिकअप गाडीसह एकूण १ लाख १२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याच परिसरात त्यावेळी चिपळूण पोलिसांनी शिरवली फाटा येथे आणखी एक गाडी पकडली आहे. या गाडीतून ६ जण विनापरवाना बंदूक घेऊन जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी निघाले होते, असे चौकशीत पुढे आले. याप्रकरणी आदित्य अनंत चव्हाण, सोहम कैलास कदम, चेतन सदानंद रसाळ, अमर सदाशिव चव्हाण, संकेत अनंत चव्हाण, सागर अशोक वाघमारे या ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

त्यांच्याकडून १८ हजार रुपये किमतीची १२ बोअर सिंगल बॅरल बंदूक, ३६० रुपये किमतीची जिवंत काडतुसे, १०० रुपये किमतीची बॅटरी आणि टाटा सुमो गाडी असा एकूण १ लाख ६८ हजार ५१० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी अन्य भागातही गस्त वाढवली आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल लालजी यादव,आशिष भालेकर, पपू केतकर आणि दिलीप जानकर या पोलीस पथकाने केली.

Web Title: Seven arrested for hunting in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.