त्या बार्जवरील खलाशांची उपासमार, १४ महिने वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 04:20 PM2020-09-28T16:20:59+5:302020-09-28T16:22:05+5:30

निसर्ग वादळामध्ये भरकटलेले दुबईतील एम़ टी़ बसरा स्टार हे बार्ज रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनारी नागरावर ठेवण्यात आलेले आहे. या बार्जवरील १३ कर्मचारी अजूनही रत्नागिरीतच असून, त्यांची उपासमार सुरु आहे़ गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पगार न मिळाल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची सुटका कोण करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे़

The sailors on that barge are starving, 14 months without pay | त्या बार्जवरील खलाशांची उपासमार, १४ महिने वेतनाविना

त्या बार्जवरील खलाशांची उपासमार, १४ महिने वेतनाविना

Next
ठळक मुद्देजहाज मालकासह प्रशासनाचेही दुर्लक्ष भरकटलेले जहाज किनारीच

रत्नागिरी : निसर्ग वादळामध्ये भरकटलेले दुबईतील एम़ टी़ बसरा स्टार हे बार्ज रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनारी नागरावर ठेवण्यात आलेले आहे. या बार्जवरील १३ कर्मचारी अजूनही रत्नागिरीतच असून, त्यांची उपासमार सुरु आहे़ गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पगार न मिळाल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांची सुटका कोण करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे़

निसर्ग वादळामध्ये ३ जून २०२० रोजी भरकटलेले जहाज अजूनही मिऱ्या किनारी एकाच जागेवर आहे़ प्रशासनाकडून हे जहाज बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत़ शिवाय या जहाजावरील सर्व १३ कर्मचारी रत्नागिरीतच अडकून पडलेले आहेत़ त्यामध्ये १० भारतीय तर फिलीपाईन्स, इथोपियन, श्रीलंका या देशातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना रत्नागिरीत ३ आॅक्टोबर रोजी ४ महिने पूर्ण होणार आहेत़ इतके दिवस होऊनही ना जहाज मालकाने, ना शासनाने त्यांची दखल घेतली. मिºया येथील स्थानिक लोकांनी त्यांना इतके दिवस मदतीचा हात पुढे केला़

१४ महिन्यांपासून ते १३ कर्मचारी घरापासून दूर आहेत़ त्यानंतर त्या जहाज मालकाने त्यांना जहाजावर चढल्याच्या दिवसापासून पगारही दिलेला नाही़ त्यातच त्यांचे कॉन्ट्रक्टही संपले असल्याने हे सर्व कर्मचारी अडचणीत सापडले आहेत़ मात्र, हे कर्मचारी संकटात असताना शासनाच्या एकाही विभागाने त्यांची दखल घेतली नसल्याचे दिसत आहे.

Web Title: The sailors on that barge are starving, 14 months without pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.