आरजीपीपीएलचा रेल्वेबराेबरचा करार संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:33 AM2021-09-19T04:33:32+5:302021-09-19T04:33:32+5:30

संकेत गाेयथळे / गुहागर : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला आरजीपीपीएल प्रकल्पाचा भारतीय रेल्वेशी केलेला वीजपुरवठा करार संपत आला ...

RGPPL's contract with Railways expires | आरजीपीपीएलचा रेल्वेबराेबरचा करार संपणार

आरजीपीपीएलचा रेल्वेबराेबरचा करार संपणार

Next

संकेत गाेयथळे / गुहागर : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला आरजीपीपीएल प्रकल्पाचा भारतीय रेल्वेशी केलेला वीजपुरवठा करार संपत आला आहे. नव्याने हा करार पूर्ववत करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही हालचाली केंद्र व राज्य शासनाकडून झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आरजीपीएल प्रकल्पावर टांगती तलवार उभी राहिली आहे.

एन्रॉन प्रकल्प बुडीत गेल्यानंतर कोट्यवधींची गुंतवणूक व तब्बल १९६० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असल्याने विजेचा तुटवडा असल्याने पुन्हा एकदा हा प्रकल्प २००५ मध्ये सुरू करण्यात आला. सात वर्षांपूर्वी प्रकल्पातून होणारी महागडी वीजनिर्मिती कोणत्याही आस्थापनेला परवडणारी नसल्याने ही वीज घेणार कोण, अशा स्थितीत निर्माण झाली होती. काही दिवस निर्मिती क्षमता असूनही प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आली. त्यानंतर भाजप सरकारच्या कारकीर्दीत प्रकल्पातून निर्मित होणारी वीज भारतीय रेल्वेला देण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार गेली अनेक वर्षे ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सातत्याने होत आहे. ‘ना नफा ना तोटा’ अशा स्थितीत प्रकल्प सुरू ठेवण्यात आला आहे. हा करार आता संपत आल्याने येथील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

रेल्वेसोबतचा वीज करार संपत आल्याची टांगती तलवार असतानाच अपुरा गॅस पुरवठा ते दुहेरी संकट सध्या प्रकल्पावर आहे. गॅसच्या कमी पुरवठ्यामुळे सध्या प्रकल्पातून दोनशे मेगावॅटच वीजनिर्मिती होत आहे. देशात निर्माण होणाऱ्या गॅस वापराचा प्राधान्यक्रमात वीजनिर्मिती प्रकल्पांना सर्वांत शेवटी ठेवण्यात आले आहे. घरगुती खतनिर्मितीसाठी वाहनांसाठी देऊन शिल्लक गॅस निर्मितीकडे वळविला जातो. त्यामुळे कावेरी बेसिनमधून आजी बिल्ला मिळणारा गॅस ७.६ एमएससीएमडी गॅसवर हा प्रकल्प तग धरून होता. ओएनजीसीकडून केवळ ०.०२ एमएससीएमडी गॅसपुरवठा होईल, असा विश्वास व्यवस्थापनाला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांत हा गॅस पुरवठाही अनियमित झाल्याने केवळ दोनशे मेगावॅट वीजनिर्मिती होते आहे. त्यामुळे रेल्वेसोबतचा करार संपण्याबरोबरच अपुऱ्या गॅस पुरवठ्याचे दुहेरी संकट प्रकल्पावर ओढवले आहे.

--------------------

कामगार धास्तावले

आरजीपीपीएल व्यवस्थापनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. प्रकल्पामध्ये तब्बल एक हजाराहून अधिक स्थानिक कामगार कार्यरत आहेत. पुन्हा एकदा प्रकल्पाबाबत अस्थिरता निर्माण झाल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: RGPPL's contract with Railways expires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.