Maharashtra Vidhan Sabha 2019 : रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 03:59 PM2019-10-07T15:59:51+5:302019-10-07T16:40:36+5:30

पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.

Retreat of BJP rebels in Ratnagiri district | Maharashtra Vidhan Sabha 2019 : रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची माघार

Maharashtra Vidhan Sabha 2019 : रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची माघार

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची माघारशिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार

चिपळूण : पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.

चिपळूणमधील माटे सभागृहात सोमवारी दुपारी शिवसेना - भाजपची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, भाजप उमेदवार तुषार खेतल, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, बांधकाम सभापती विनोद झगडे, ज्येष्ठ कर्यकर्ते सुधीर काणे, बाळा कदम यांच्यासह शिवसेना - भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पटवर्धन यांनी राजापूरमधून प्रसाद पाटोळे, संतोष गांगण , चिपळूणमधून तुषार खेतल, गुहागरमधून रामदास राणे, दापोलीमधून केदार साठे या भाजप उमेदवारांनी माघार घेतली असल्याचे जाहीर केले.

दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, एकही मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होते. म्हणून आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्वांना युतीची भूमिका पटवून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल म्हणाले की, कार्यकत्यार्ना न्याय मिळण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अर्ज दाखल केला होता. मात्र, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी चर्चा केली. त्यानंतर अर्ज माघारीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

आमदार सदानंद चव्हाण म्हणाले की, खेतल यांचा अर्ज अपक्ष म्हणून होता. मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते पण त्यांनी पक्षादेश मानत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Web Title: Retreat of BJP rebels in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.