नाट्य स्पर्धेसाठी रत्नागिरी विभागाची टीम नांदेडला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:15 AM2019-12-19T11:15:44+5:302019-12-19T11:19:10+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत कामगार कल्याण समितीतर्फे एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नांदेड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्य मार्ग परिवहन कामगार कल्याण समिती, रत्नागिरी विभागातर्फे ह्यसलवा जुडूमह्ण नाटक सादर करण्यात येणार आहे. शंकरराव चव्हाण नाट्यगृह, नांदेड येथे दि. २० रोजी होणाºया स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ बुधवारी सायंकाळी नांदेडकडे रवाना झाला.

Ratnagiri division team leaves for Nanded | नाट्य स्पर्धेसाठी रत्नागिरी विभागाची टीम नांदेडला रवाना

नाट्य स्पर्धेसाठी रत्नागिरी विभागाची टीम नांदेडला रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देनाट्य स्पर्धेसाठी रत्नागिरी विभागाची टीम नांदेडला रवानाकामगार कल्याण समितीच्या स्पर्धेत सादर होणार सलवा जुडूम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत कामगार कल्याण समितीतर्फे एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नांदेड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्य मार्ग परिवहन कामगार कल्याण समिती, रत्नागिरी विभागातर्फे ह्यसलवा जुडूमह्ण नाटक सादर करण्यात येणार आहे. शंकरराव चव्हाण नाट्यगृह, नांदेड येथे दि. २० रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ बुधवारी सायंकाळी नांदेडकडे रवाना झाला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रत्नागिरी विभाग व राज्य परिवहन कामगार कल्याण समिती, रत्नागिरी विभाग यांच्यातर्फे दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदविला जातो. वेळोवेळी रत्नागिरी संघाने स्पर्धेत बक्षीसही मिळविले आहे.

यावर्षी दोन अंकी सामाजिक वास्तववादी नाटक सलवा जुडूम सादर केले जाणार आहे. नाटकाचे लेखन इरफान मुजावर यांनी केले असून, दिग्दर्शन राजेश मयेकर, निर्मितीप्रमुख विभाग नियंत्रक सुनील भोकरे आहेत.

निर्मिती सहाय्यक उपयंत्र अभियंता रमाकांत शिंदे, विभागीय भांडार अधिकारी भक्ती वेल्हाळ, सूत्रधार कामगार अधिकारी प्रवीण पाटील आहेत. प्रकाश योजना, अनिष शिवलकर, पार्श्वसंगीत रवींद्र तेरवणकर, नेपथ्य प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, इस्माईल काजी, रंगमंच व्यवस्था अमित लांजेकर, रवींद्र तेरवणकर, वेषभूषा कृष्णकांत साळवी, प्रसाद मोहिते, रंगभूषा अमित लांजेकर, रसिका गावडे करणार आहेत.

नाटकामध्ये कृष्णकांत साळवी (दासू), नंदकुमार भारती (पुनित), शैलेंद्र हातिसकर (कमांडर), प्रशांत आडिवरेकर (श्याम), राजेश कीर (कॅप्टन), अमित लांजेकर (जवान-२), राजेश मयेकर (जवान-३), संजय डोर्लेकर (मुखिया), प्रियांका झोरे (आक्कु), प्रदीप घवाळी (नथू), संतोष खरात (चित्रा), प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, रवींद्र तेरवणकर, दिलीप सुर्वे, ज्ञानेश मिरजकर, विजय पडते, रसिका गावडे, प्रियांका झोरे (गावकरी), सुप्रिती शिवलकर (वेदी), प्रमुख भूमिका बजावणार आहेत.

 

Web Title: Ratnagiri division team leaves for Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.