रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:18 PM2019-08-27T13:18:58+5:302019-08-27T13:21:00+5:30

पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.

Ratnagiri - dispute over Raigad district ends | रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार

रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार

Next
ठळक मुद्दे गणेशोत्सवाच्या काळात ग्रामस्थांना दिलासा, वाद संपुष्टात आल्याने आनंदवादामुळे बस फेऱ्या ठेवल्या होत्या बंद

रत्नागिरी : पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.

पोलादपूर तालुक्यातील कालवली मोहल्ला येथील रस्ता, पैठण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रालगतचा रस्ता वादातीत राहिला होता. या रस्त्यांबाबतच्या वादावर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील कातळी पळचील या रस्त्यावरील वाद सुरू होता.

कशेडी टॅब पोलीस चौकीच्या समोरील या रस्त्याच्या डाव्या बाजूची घरे रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असून, उजव्या बाजूच्या घरांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे समोरासमोरील कुटुंबांना या वादाचा फटका बसत होता. या रस्त्यावरून पळचील, गोलदरा, तामसडे, महालगूर भागात जाणाऱ्या वाहनांना विशेषत: एस्. टी. महामंडळाच्या बसेसना रायगड हद्दीतील घराच्या काँक्रीटच्या कम्पाऊंड वॉलचा अडथळा होत होता. त्यामुळे अलिकडेच येथून पळचीलकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या होत्या.

याविषयी पोलादपूर तहसीलदार घोरपडे यांनी नायब तहसीलदार समीर देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलीसपाटील आनंद निविलकर यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्त्यावरील वादग्रस्त अतिक्रमण असलेली कम्पाऊंड वॉल जेसीबीद्वारे भुईसपाट करून हा वाद कायमचा दूर केला. परिणामी, या रस्त्यावरून बंद झालेल्या बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत.

Web Title: Ratnagiri - dispute over Raigad district ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.