One injured in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

रत्नागिरी : पावस येथून मेर्वीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने झडप घालून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली. संतोष कुरतडकर आणि मंगेश खेर्डे हे दोघे दुचाकीवरून पावस येथून मेर्वीत निघाले हाेते. त्याचवेळी गणेशगुळे येथे चालत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात मंगेश खेर्डे गंभीर जखमी झाले आहेत. या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून हा पाचवा हल्ला आहे.


Web Title: One injured in leopard attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.