चिपळुणात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ४०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:31 AM2021-04-11T04:31:47+5:302021-04-11T04:31:47+5:30

चिपळूण : एकीकडे वीकेंड लॉकडाऊन सुरू असताना शहर व परिसरात कोरोना रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात ...

The number of corona victims in Chiplun has reached 400 | चिपळुणात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ४०० वर

चिपळुणात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ४०० वर

Next

चिपळूण : एकीकडे वीकेंड लॉकडाऊन सुरू असताना शहर व परिसरात कोरोना रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात आतापर्यंत ४०२ वर बाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे. शहरासह सावर्डे, खेर्डी परिसरात रुग्ण संख्या अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही हैराण झाली आहे.

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेग घेऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी तालुका आणि चिपळूण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याची परिस्थिती दिसू लागली आहे. गेल्या वर्षीपेक्षा भयंकर वेगाने कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने नवीन रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. ही रुग्ण संख्या अशाच वेगाने वाढत राहिली तर परिस्थिती बिकट होणार आहे. याची दक्षता घेत प्रशासनाने उपाययोजनेवर अधिक भर दिला आहे. तूर्तास तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण ३३५२ वर पोहोचली आहे. त्यापैकी २८३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर ११७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत ४०२ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये शहरातील ९७ रुग्णांचा समावेश आहे. तसेच सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५७, अडरे -खेर्डी ४८, कापरे ९, खरवते ४९, दादर ४, फुरूस २८, रामपूर ३१, वहाळ २२, शिरगांव १६ अशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आहे. एकट्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात ७५ जण उपचार घेत आहेत. तर २१४ जण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव स्वतः आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत आहेत. तसेच तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यावर भर दिला आहे.

Web Title: The number of corona victims in Chiplun has reached 400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.