आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची कोविड केअर सेंटरला अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:53 AM2020-10-03T11:53:02+5:302020-10-03T11:54:38+5:30

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रत्नागिरी येथील एका कोविड केअर सेंटरला अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

Minister of State for Health Yadravkar pays a surprise visit to Kovid Care Center | आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची कोविड केअर सेंटरला अचानक भेट

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची कोविड केअर सेंटरला अचानक भेट

Next
ठळक मुद्देआरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची कोविड केअर सेंटरला अचानक भेटरुग्ण आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याशी साधला संवाद

रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रत्नागिरी येथील एका कोविड केअर सेंटरला अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

उपचार घेणाऱ्या रुग्णांशी विचारपूस करीत संवाद साधला, यावेळी आरोग्य अधिकारी यांच्याकडून कोविड सेंटरमध्ये मिळत असलेल्या व दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेतली.

राज्यमंत्री यड्रावकर हे कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबरपासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध कोविड केअर केंद्रांना भेटी देणार आहेत. तसेच त्यासंदर्भात आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेणार आहेत.

रत्नागिरीत येत असताना गुरुवारी रात्री कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवनमधील कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट दिली. येथील ७३ कोरोनाबाधित रुग्णांची आरोग्यविषयक चौकशी करीत काही रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोविड विषयक परिस्थितीची माहिती घेतली.
 

Web Title: Minister of State for Health Yadravkar pays a surprise visit to Kovid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app