रत्नागिरी भाजीमार्केट परिसरातील अनेक घरातून पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:07 PM2021-06-14T12:07:30+5:302021-06-14T12:08:55+5:30

Rain Ratnagiri : रत्नागिरी शहरातील भाजी मार्केट मागील मुजावर कंपाऊंड येथील अनेक घरातून पावसाचे पाणी शिरले आहे. मच्छिमार्केट जवळून वाहणाऱ्या प्रवाहाने आपला मार्ग बदलला आहे. नगरपालिकेने नाले सफाई न केल्याने ही समस्या उद्भवल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अचानक पावसाचे पाणी घरात शिरल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

Many houses in the Ratnagiri vegetable market area were flooded | रत्नागिरी भाजीमार्केट परिसरातील अनेक घरातून पाणी शिरले

रत्नागिरी भाजीमार्केट परिसरातील अनेक घरातून पाणी शिरले

Next
ठळक मुद्देरत्नागिरी भाजीमार्केट परिसरातील अनेक घरातून पाणी शिरलेचांदेराई परिसरात मुसळधार पाऊस ,नदीच्या पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी : शहरातील भाजी मार्केट मागील मुजावर कंपाऊंड येथील अनेक घरातून पावसाचे पाणी शिरले आहे. मच्छिमार्केट जवळून वाहणाऱ्या प्रवाहाने आपला मार्ग बदलला आहे. नगरपालिकेने नाले सफाई न केल्याने ही समस्या उद्भवल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अचानक पावसाचे पाणी घरात शिरल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

चांदेराई परिसरात मुसळधार पाऊस ,नदीच्या पाणी पातळीत वाढ

गेल्या तीन तासांपासून चांदेराई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे अद्याप पुलापर्यंत पाणी आले नसले तरी असा पाऊस कोसळत राहिला तर केव्हाही पाणी पुलावर येऊ शकते व बाजारपेठेत पाणी भरू शकते त्यामुळे बाजारपेठेतील दुकानदारानीआपल्या दुकानातील माल हलवण्यास सुरुवात केली आहे मात्र पोलीस पाटील वगळता शासकीय यंत्रणेपैकी कोणीही तिथे नसल्याचे कळते.

Web Title: Many houses in the Ratnagiri vegetable market area were flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.