मंडणगड नगर पंचायत प्रभागांचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:26 PM2020-11-12T13:26:10+5:302020-11-12T13:28:04+5:30

mandangad, nagrpanchyat, elecation, ratnagirinews मंडणगड नगर पंचायतीच्या २०२० - २१मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रांताधिकारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. त्यानुसार आता इच्छुक उमेदवारांनी आपापली आखणी सुरू केली आहे.

Mandangad Nagar Panchayat ward reservation announced | मंडणगड नगर पंचायत प्रभागांचे आरक्षण जाहीर

मंडणगड नगर पंचायत प्रभागांचे आरक्षण जाहीर

Next
ठळक मुद्दे निवडणुकीचे बिगुल वाजले आरक्षण निश्चितीनंतर इच्छुकांकडून आखणी सुरू

मंडणगड : मंडणगड नगर पंचायतीच्या २०२० - २१मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रांताधिकारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. त्यानुसार आता इच्छुक उमेदवारांनी आपापली आखणी सुरू केली आहे.

कार्यक्रमाला तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, मुख्याधिकारी वैभव साबळे, यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. सन २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी निर्धारित झालेले प्रभाग क्रमांक बदलण्याबरोबर जुने आरक्षणही रोटेशन पध्दतीने चिठ्या टाकून काढण्यात आले.

प्रभाग क्रमांक १ आदर्श नगर - सर्वसाधारण महिला, प्रभाग २ बोरीचा माळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ३ केशवशेठ लेंडे नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ४ शिवाजीनगर - सर्वसाधारण, प्रभाग ५ साई नगर -सर्वसाधारण, प्रभाग ६ दुर्गवाडी २ - नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, प्रभाग ७ सापडेवाडी - सर्वसाधारण, प्रभाग ८ - दुर्गवाडी १ - सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ भेकतवाडी- सर्वसाधारण महिला, प्रभाग १० कोंझर - नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, प्रभाग क्रमांक ११ धनगरवाडी - सर्वसाधारण, प्रभाग १२ तुरेवाडी, कुंभारवाडी - सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ बौध्दवाडी १ - सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ बौध्दवाडी २ - अनुसुचित जाती महिला राखीव, प्रभाग १५ गांधी चौक २ - सर्वसाधारण, प्रभाग १६ गांधी चौक १ - सर्वसाधारण, प्रभाग १७ तुरेवाडी, सोनारवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव. प्रभाग आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदवण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२० रोजीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महिलांकरिता एकूण ९ प्रभाग आरक्षित

आरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १, ८, ९, १२, १३ हे पाच प्रभाग आरक्षित झाले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक २, ३, १७ हे तीन प्रभाग आरक्षित झाले आहेत. अनुसुचित जाती महिलांकरिता प्रभाग क्रमांक १४ आरक्षित झाला आहे.
 

Web Title: Mandangad Nagar Panchayat ward reservation announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.