The leopard attacked and killed the dog | बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त

बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त

ठळक मुद्देबिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त वेरवली बुद्रुक येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

लांजा : वेरवली बुद्रुक येथील श्रीकृष्ण सरदेसाई यांचा पाळीव श्वान बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वेरवली बुद्रुक येथील श्रीकृष्ण नरहर सरदेसाई यांनी पाळलेला श्वान बुधवारी सकाळी कुठेही आढळला नाही. त्यांनी घराच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर देसाई यांनी त्यांनी घराच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पाहिले असता त्यांना धक्का बसला.

घराच्या अंगणात असलेल्या श्वानावर रात्री १० वाजता बिबट्याने झडप घालून येथून धूम ठोकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्या घरापर्यंत पोहोचल्याने गावात बिबट्याचा संचार असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: The leopard attacked and killed the dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.