पावसमध्ये दोघांवर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:47 PM2020-09-16T17:47:07+5:302020-09-16T17:48:15+5:30

पावस परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, रात्री आणखी दोघांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. बेहेरे स्टॉपजवळ ही घटना घडली.

Leopard attack on both in the rain | पावसमध्ये दोघांवर बिबट्याचा हल्ला

पावसमध्ये दोघांवर बिबट्याचा हल्ला

Next
ठळक मुद्देपावसमध्ये दोघांवर बिबट्याचा हल्ला वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल, शोध सुरू

पावस : परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, रात्री आणखी दोघांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. बेहेरे स्टॉपजवळ ही घटना घडली.

अजय अरुण थूळ (रा. मावळंगे, रत्नागिरी) हा ८ वाजता दुचाकीवरून गावखडीहून आपल्या घरी चालला होता. तर पायल राकेश खरडे या सायंकाळी दुकान बंद करून पतीसोबत दुचाकीवरून ९ वाजता पावस येथून मेर्वीकडे जात होत्या.

रत्नागिरी - पावस मार्गावरील बेहेरे स्टॉप दरम्यान हे दोघेही आले असता बिबट्याने काळोखात हल्ला केला. त्यामध्ये दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. या हल्ल्याबाबत वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.

Web Title: Leopard attack on both in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.