चिपळुणात काँग्रेसकडून वादग्रस्त पुस्तकाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:26 PM2020-01-14T16:26:25+5:302020-01-14T16:27:27+5:30

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणा स्थान आहेत. त्यांच्याबाबत भाजपकडून नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवराय यांची तुलना करण्याचा खोडसाळपणा केला आहे. या वृत्तीचा चिपळूण काँग्रेसतर्फे मंगळवारी सकाळी निषेध करण्यात आला. यावेळी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक या पुस्तकाची होळी करण्यात आली.

Holi of controversial book by Congress in Chiplun | चिपळुणात काँग्रेसकडून वादग्रस्त पुस्तकाची होळी

चिपळुणात काँग्रेसकडून वादग्रस्त पुस्तकाची होळी

Next
ठळक मुद्देचिपळुणात काँग्रेसकडून वादग्रस्त पुस्तकाची होळीपुस्तक जाळून निदर्शने

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणा स्थान आहेत. त्यांच्याबाबत भाजपकडून नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवराय यांची तुलना करण्याचा खोडसाळपणा केला आहे. या वृत्तीचा चिपळूण काँग्रेसतर्फे मंगळवारी सकाळी निषेध करण्यात आला. यावेळी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक या पुस्तकाची होळी करण्यात आली.

चिपळूण ब्लॉक काँग्रेसतर्फे चिपळूण नगर पालिकेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा निषेध करण्यात आला. सुरूवातीला सुधीर शिंदे यांनी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक जाळून निदर्शने करण्यात आली.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष गौरी रेळेकर, युवक तालुकाध्यक्ष महेश कदम, ओबीसह सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, तालुका प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, नगरसेवक कबीर कादरी, नगरसेविका संजीवनी शिगवण, सफा गोठे, युवक शहराध्यक्ष फैसल पिलपले, युवक तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, शहर उपाध्यक्ष मनोज दळी, सुधीर जनावळकर, यतीश कडवाईकर, नंदू कामात, खजिनदार अविनाश हरदारे, जिल्हा सरचिटणीस मुनावर चौगुले, अब्दुल बेबल, गुलाजर कुरवले, अल्ताफ दळवी, मनुद्दीन सैयद, मस्तान सैयद, याकूब सैय्यद, माजी नगरसेवक रमेश खळे, इम्तियाज कडू , बरकत पाते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Holi of controversial book by Congress in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.