रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी आरोग्यमंत्री सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 02:35 PM2020-10-19T14:35:56+5:302020-10-19T14:37:41+5:30

hospital, rajeshtope, ratnagiri रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर जागा शोधून ठेवा, सगळी पूर्वतयारी करा, महाविद्यालयासाठी अध्यादेश काढायला तयार आहे. कारण ठाकरे कुटुंबाचा कोकणावर फार जीव असून, त्याला तत्काळ मान्यता मिळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Health Minister positive for setting up a medical college in Ratnagiri | रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी आरोग्यमंत्री सकारात्मक

रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी आरोग्यमंत्री सकारात्मक

Next
ठळक मुद्दे २० एकर जागा शोधून ठेवा, महाविद्यालयासाठी अध्यादेश काढायला तयारठाकरे कुटुंबाचा कोकणावर जीव

रत्नागिरी : रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर जागा शोधून ठेवा, सगळी पूर्वतयारी करा, महाविद्यालयासाठी अध्यादेश काढायला तयार आहे. कारण ठाकरे कुटुंबाचा कोकणावर फार जीव असून, त्याला तत्काळ मान्यता मिळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे रविवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात, तर खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अध्यादेश काढून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळवली. त्याप्रमाणे रत्नागिरीतही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळू शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

पालकमंत्री अनिल परब यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे रत्नागिरीत कोरोनाची वाढ रोखण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आणता आला. रत्नागिरीत गेल्या २४ तासात एकाही मृत्यूची नोंद नाही, हे या मोहिमेचेच यश असल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, रोज ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या रत्नागिरी तालुक्यासह लगतच्या मतदार संघात आता आकडा शुन्यावर आला. यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व जिल्हा प्रशासन यांचे यश आहे, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आदिंची या कार्यक्रमास उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आभार मानले.

मृत्यूदरही खाली नेऊ

रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाचे चांगले काम सुरू आहे. प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्यूदरही एक टक्क्यांच्या खाली नेऊ, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Health Minister positive for setting up a medical college in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.