रत्नागिरीत गोवा बनावटीचे मद्य जप्त, एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:09 PM2021-02-18T14:09:38+5:302021-02-18T14:12:29+5:30

liquor ban Ratnagiri Excise Department - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे छापा मारून ३६,९७० रुपयांचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी स्वरूप संजय नरवणकर (२६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa-made liquor seized in Ratnagiri | रत्नागिरीत गोवा बनावटीचे मद्य जप्त, एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरीत गोवा बनावटीचे मद्य जप्त, एकावर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देरत्नागिरीत गोवा बनावटीचे मद्य जप्तएकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे छापा मारून ३६,९७० रुपयांचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी स्वरूप संजय नरवणकर (२६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारूविरोधात मोहीम हाती घेतली आहे. झाडगाव येथे गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान स्वरूप नरवणकर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात घराच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये मद्याचा साठा मिळाला.

ही कारवाई उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य, भरारी पथकाचे उपनिरीक्षक किरण पाटील, जवान निनाद सुर्वे, विशाल विचारे, मिलिंद माळी, सागर पवार, रोहन तोडकरी यांनी केली.

Web Title: Goa-made liquor seized in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.