भरणे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे हटविली, टपऱ्या जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:52 AM2019-12-19T11:52:51+5:302019-12-19T11:53:38+5:30

खेड-भरणे मार्गावरील भरणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली टपऱ्या, तात्पुरत्या शेड आदी बांधकामे भरणे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिमेत हटविण्यात आली.

 Fill the Gram Panchayat boundaries, deleted the landfills | भरणे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे हटविली, टपऱ्या जमीनदोस्त

भरणे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे हटविली, टपऱ्या जमीनदोस्त

Next
ठळक मुद्दे भरणे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे हटविली, टपऱ्या जमीनदोस्तअनधिकृत बांधकामांवर केव्हा कारवाई होणार

खेड : खेड-भरणे मार्गावरील भरणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली टपऱ्या, तात्पुरत्या शेड आदी बांधकामे भरणे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिमेत हटविण्यात आली.

भरणे नाका परिसरात खेड मार्गावर आठवडा बाजार दर मंगळवारी भरवण्यात येतो. याच भागात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याच्या कडेला टपरी वजा हॉटेल, भाजी फळ विक्रेत्यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनाधिकृतरीत्या टपऱ्या व शेड उभारल्या होत्या.

हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांच्या टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या असल्या तरी महामार्ग व खेड भरणे मार्गावर अनेक ठिकाणी पक्क्या स्वरूपात उभी असलेली अनधिकृत बांधकामांवर केव्हा कारवाई होणार असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.

Web Title:  Fill the Gram Panchayat boundaries, deleted the landfills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.