दुसरी लाट येऊ द्यायची नाही : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 02:01 PM2020-10-19T14:01:02+5:302020-10-19T14:03:50+5:30

coronavirus, online, hospital, Uddhav Thackeray, ratnagiri कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी एमएएच अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी माँकसम सर्वांनी घ्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटनावेळी केले.

Don't let another wave come: Uddhav Thackeray | दुसरी लाट येऊ द्यायची नाही : उद्धव ठाकरे

दुसरी लाट येऊ द्यायची नाही : उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देदुसरी लाट येऊ द्यायची नाही : उद्धव ठाकरेरत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या सुविधेचे उद्घाटन

रत्नागिरी : कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी एमएएच अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी माँकसम सर्वांनी घ्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटनावेळी केले.

दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने रविवारी या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमाला मुंबईतून पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, जालन्यातून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रत्नागिरीतून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांच्या सोबतच खासदार विनायक राऊत दिल्ली येथून सहभागी झाले होते. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, कोकणला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे ही प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोनवेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, याच पद्धतीने आगामी काळात जाणीव जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन हवे की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा, असे ते म्हणाले.
 

Web Title: Don't let another wave come: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.