विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 11:29 AM2020-10-09T11:29:55+5:302020-10-09T11:31:50+5:30

Uday Samant, mumbi univercity, ratnagirinews, educationsector, मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत काहीच गोंधळ झालेला नाही. विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे हा सर्व्हर डाऊन झाला. याबाबत मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Cyber attack on university server - Information from Education Minister Uday Samant | विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्दे विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला- शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहितीमुंबई पोलीस सहआयुक्तांकडे तक्रार

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत काहीच गोंधळ झालेला नाही. विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे हा सर्व्हर डाऊन झाला. याबाबत मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली असून, याप्रकरणाची चौकशी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

ते म्हणाले, आॅनलाईन शिक्षणाचा काहीच घोळ नाही. घोळ घालणारेच हा घोळ घालतात. मंगळवारी झालेली परीक्षा ही बाहेरून परीक्षेला बसू इच्छिणाऱ्यांसाठी होती. मात्र, यासाठी कार्यरत असलेल्या सर्व्हरवरच सायबर अ‍ॅटॅक झाला. त्यामुळे ९ हजार विद्यार्थी परीक्षा देत असतानाच एकदम अडीच लाख विद्यार्थी ही लिंक ओपन करताना दिसले. यंत्रणा ठप्प होण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सामंत यांनी सांगितले. हा सायबर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ग्रंथालये सुरू होणार

लॉकडाऊनमुळे वाचनालये बंद आहेत. अनेक जणांना वाचनालये, ग्रंथालये सुरू होण्याची प्रतीक्षा असून, त्यासाठी मागणी होत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत वाचनालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

खडसेंनी उद्धव ठाकरेंसोबत काम करावे

नाराज एकनाथ खडसे यांनी कुठे जावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत आपण काही बोलू शकत नाही. ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले.

Web Title: Cyber attack on university server - Information from Education Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.