coronaVirus- कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो, दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 02:35 PM2021-05-15T14:35:47+5:302021-05-15T14:42:45+5:30

NCP CoronaVirus Chiplun Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे घरगुती गॅस, पेट्रोल डिझेल यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणाऱ्या दरवाढीविरोधात जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कळंबस्ते येथे केंद्र सरकारचा निषेध केला़ यावेळी कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो अशा शब्दात महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

coronaVirus- Corona survived and died of inflation | coronaVirus- कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो, दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

coronaVirus- कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो, दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

Next
ठळक मुद्देकोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलोजीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

अडरे/चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे घरगुती गॅस, पेट्रोल डिझेल यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणाऱ्या दरवाढीविरोधात जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कळंबस्ते येथे केंद्र सरकारचा निषेध केला़ यावेळी कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो अशा शब्दात महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

दिवसेंदिवस महागाईत वाढ झाली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे़ दिवसेंदिवस सर्वच वस्तूंमध्ये वाढ होत असल्याने महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी है तो महंगाई है या बॅनरखाली चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे आंदोलन केले.

हातात विविध फलक घेत घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती विरोधात निषेध केला. यावेळी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, चिपळूण शहराध्यक्ष दीपिका कोतवडेकर, स्नेहा काटदरे, रेणुका गांजेकर, मंदिरा मिराशी, विशाखा चांदे, अमित पवार, रमेश गांजेकर उपस्थित होते.

 

Web Title: coronaVirus- Corona survived and died of inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.