आता व्हाॅट्सॲपवर केवळ एका मिनिटात उपलब्ध होणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 04:42 PM2021-11-27T16:42:18+5:302021-11-27T16:44:41+5:30

प्रवासात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केल्यानंतर मोबाइलवरच शोधावे लागते. मात्र, केंद्र सरकारने यासाठी व्हाॅट्सॲप हेल्पलाइन उपलब्ध करून दिली असल्याने या क्रमांकावर केवळ एका मिनिटात हे प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे.

Corona vaccination certificate will now be available on WhatsApp | आता व्हाॅट्सॲपवर केवळ एका मिनिटात उपलब्ध होणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र

आता व्हाॅट्सॲपवर केवळ एका मिनिटात उपलब्ध होणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र

googlenewsNext

शोभना कांबळे

रत्नागिरी : प्रवासात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केली जाते. मात्र, काही वेळा मोबाइलवरच शोधावे लागते. मात्र, केंद्र सरकारने यासाठी व्हाॅट्सॲप हेल्पलाइन उपलब्ध करून दिली असल्याने या क्रमांकावर केवळ एका मिनिटात हे प्रमाणपत्र व्हाॅट्सॲपवरच उपलब्ध होत आहे.

काेरानाच्या अनुषंगाने नागरिकांसाठी केंद्र सरकारने विविध महत्त्वाची ॲप्लिकेशन्स मोबाइलवर उपलब्ध करून दिली आहेत. लसीकरण सुविधा मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदणीसाठी तसेच त्यानंतर पहिला डोस आणि दुसऱ्या डोसची नोंदणी करण्यासाठी, त्यानंतर अंतिम प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने इतर उपयुक्त माहिती मिळण्यासाठी केंद्रसरकारने ‘कोविन १९’ हे पोर्टल सुरू केले होते. त्यामुळे यावर लसीकरणासाठी नोंदणी करतानाच त्यावर मिळणाऱ्या इतर माहितीचा उपयोग नागरिकांना होत होता.

मात्र, आता अगदी मिनिटात आपले लसीकरण प्रमाणपत्र हवे असेल ते व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून अगदी मिनिटात उपलब्ध होत आहे. बरेचदा आपले प्रमाणपत्र मोबाइलला डाऊनलोड केलेले असले तरी काही वेळा शोधाशोध करावी लागते. कुठे संचयित करून ठेवले, हेच काही वेळा लक्षात येत नाही. मात्र, आता कुठलीच यातायात न करता केंद्र सरकारच्या ‘९०१३१५१५१५’ या ‘Corona Help Desk’ च्या व्हाॅट्सॲप नंबरवर ही सुविधा देऊ केली आहे. गेल्या वर्षापासून ही सुविधा सुरू होती. मात्र, त्याची माहिती फारशी कुणाला नव्हती. या व्हाॅट्सॲपवर ‘certificate’ अस टाइप करताच ओटीपीच्या माध्यमातून अगदी मिनिटात आपले लसीकरण प्रमाणपत्र व्हाॅट्सॲपवरच मिळते.

प्रवासात किंवा कुठल्याही ठिकाणी आपल्याला कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करावयाचे झाल्यास ‘Corona Help Desk’च्या सेव्ह केलेल्या ९०१३१५१५१५’ या व्हाॅट्सॲप नंबरवर काही सेंकदातच प्रमाणपत्र उपलब्ध होत असल्याने ऐन वेळी उपलब्ध होऊ शकते. याचबरोबर मेन मेनूमध्येही आपल्याला आठ प्रकारचे पर्याय निवडून त्यातून कोरोनाची लक्षणे, रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल, प्रेरणादायी यशस्वी कथा, कोरोनाची माहिती, लक्षणे, खबरदारी अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते. तसेच राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर कुठली मदत हवी असेल तर तीही मदत मिळविता येते. त्यामुळे केंद्र सरकारचा हा उत्तम उपक्रम असलेल्या कोरोना हेल्प डेस्कचा व्हाॅट्सॲप नंबर प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाइलमध्ये जतन करून ठेवायलाच हवा.

कसे मिळवाल लसीकरण प्रमाणपत्र...

९०१३१५१५१५ हे व्हाॅट्सॲप नंबर सेव्ह करा. त्यावर ‘certificate’ असे टाइप करा. आपल्या नोंदणीकृत मोबाइलवर ६ आकडी ओटीपी नंबर येईल, तो नंबर त्याखाली टाइप करा. ३० सेकंदात खात्री केल्यानंतर आपले नाव येईल. त्यानंतर १ टाइप केल्यास लसीकरण प्रमाणपत्र व्हाॅट्सॲपवरच येते. तसेच Menu टाइप केल्यावर विविध पर्याय येतात.

Web Title: Corona vaccination certificate will now be available on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.