corona in ratnagiri-कोरोना रूग्णाची माहिती लपवल्यामुळे डॉक्टरवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 02:52 PM2020-04-09T14:52:16+5:302020-04-09T14:54:39+5:30

कोरोनाबाधीत रूग्णाबाबात माहिती लपवल्याच्या कारणावरून खेडमधील डॉ. जावेद महाडिक यांच्याविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कोरोना रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे.

corona in ratnagiri- Doctor accused of hiding corona patient information | corona in ratnagiri-कोरोना रूग्णाची माहिती लपवल्यामुळे डॉक्टरवर गुन्हा

corona in ratnagiri-कोरोना रूग्णाची माहिती लपवल्यामुळे डॉक्टरवर गुन्हा

Next
ठळक मुद्देकोरोना रूग्णाची माहिती लपवल्यामुळे डॉक्टरवर गुन्हाखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

रत्नागिरी : कोरोनाबाधीत रूग्णाबाबात माहिती लपवल्याच्या कारणावरून खेडमधील डॉ. जावेद महाडिक यांच्याविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कोरोना रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे.

दुबईमधून आलेल्या एका पन्नास वर्षाच्या प्रौढाचा बुधवारी खेडमध्ये मृत्यू झाला. तो कोरोनाबाधीत होता. गेले काही दिवस त्याच्यावर खेडमध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला ६ एप्रिल रोजी कळंबणी (खेड) उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्याच्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात तो कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

त्याच्यावर खेडमध्ये काही दिवस उपचार सुरू होते. मात्र या रूग्णामध्ये कोरोनाची लक्षणे असतानाही त्याबाबतची माहिती प्रशासनाला कळवण्यात आली नाही, असा ठपका ठेवून डॉ. जावेद महाडिक यांच्याविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: corona in ratnagiri- Doctor accused of hiding corona patient information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.