Congress district president Ramesh Kadam to be robbed | काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू
काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू

ठळक मुद्देकाँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चूखेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची निवड

रत्नागिरी : काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष बदल झाला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याजागी खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

मूळचे काँग्रेसचे असलेले रमेश कदम १९९९ साली राष्ट्रवादीत गेले. चिपळूणचे आमदार झाले. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. आठ महिने भाजपमध्ये राहिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि जिल्हाध्यक्ष झाले. मात्र, आता त्यांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याजागी अ‍ॅड. भोसले यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळेच हा बदल झाला आहे.


Web Title: Congress district president Ramesh Kadam to be robbed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.