चिपळूण जे.के. फाईल्स कंपनीत २२ कंत्राटी कामगार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:12 AM2019-12-04T11:12:14+5:302019-12-04T11:13:20+5:30

चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथील रेमंड उद्योग समूहाच्या जे.के.फाईल्स इंडिया लिमिटेड या कंपनीत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कामगारांना इंजिनिअरिंग वर्कर्स असोसिएशन युनियनच्या प्रयत्नातून व्यवस्थापनाने २२ कंत्राटी कामगारांना कायम केले असून त्यांना ३ डिसेंबर रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

Chiplun J.K. Five contract workers remain in the files company | चिपळूण जे.के. फाईल्स कंपनीत २२ कंत्राटी कामगार कायम

चिपळूण जे.के. फाईल्स कंपनीत २२ कंत्राटी कामगार कायम

googlenewsNext
ठळक मुद्देचिपळूण जे.के. फाईल्स कंपनीत २२ कंत्राटी कामगार कायमयुनियनच्या प्रयत्नातून अधिकृत नियुक्तीपत्र

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथील रेमंड उद्योग समूहाच्या जे.के.फाईल्स इंडिया लिमिटेड या कंपनीत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कामगारांना इंजिनिअरिंग वर्कर्स असोसिएशन युनियनच्या प्रयत्नातून व्यवस्थापनाने २२ कंत्राटी कामगारांना कायम केले असून त्यांना ३ डिसेंबर रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.


कोणत्याही उद्योगातील कंत्राटी कामगार कंपनी सेवेत कायम होणे ही महत्त्वाची बाब आहे. त्याचबरोबर उद्योगाच्या यशासाठी प्रत्येक कायम कामगारांची जबाबदारी कायमस्वरूपी घेतली जाते. तिथे त्यांची कर्तव्य तितकची महत्त्वाची आहे. याची जाणीव करत प्लान्टहेड नितीन देव यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 

यावेळी एचआर मॅनेजर राहुल पाटील, राजेश शिंदे, युनियनचे अध्यक्ष मंगेश शिंदे, मंगेश गोटल, दिलीप शिंदे, प्रसाद जोशी, प्रदीप पाटील, दीपक आंब्रे, सुरेश घाडी आदी उपस्थित होते.

 

Web Title: Chiplun J.K. Five contract workers remain in the files company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.