बोअरवेलचे पाणी थांबता थांबेना, जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा, लोकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 01:19 PM2021-03-31T13:19:55+5:302021-03-31T13:22:08+5:30

Water Chiplun Ratnagiri-एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करू लागले आहेत.

Borewell water doesn't stop ... | बोअरवेलचे पाणी थांबता थांबेना, जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा, लोकांची गर्दी

बोअरवेलचे पाणी थांबता थांबेना, जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा, लोकांची गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देजमिनीतून पाण्याचा मोठा फवारा पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी

असुर्डे /चिपळूण : एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करू लागले आहेत.

हिंदू धर्म शास्त्रानुसार जलाची पूजा केली जाते. लाखो रुपये खर्च करूनही ते मिळत नाही. सध्याच्या दिवसात तर चांगले चांगले स्रोत आटून जातात. परंतु कोकरे येथील संजय व मनोज पर्शराम दळवी यांच्या बादी येथील शेत जमिनीने मात्र कमालच केली आहे.

तेथे खोदलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा ओघ काही केल्या थांबत नाही. या शेत जमिनीत झाडांची लागवड केली आहे. ती अतितीव्र उष्णतेमुळे सुकून जात होती. यासाठी या भावांनी बोअरवेल पाडण्याचा निर्णय घेतला. अखेर मंगळवारी रात्री २० फुटापर्यंत बुरूम माती तर १५० फुटापर्यंत कातळ लागला.

त्यानंतर १७० फुटापर्यंत बोअरवेलचे खोदकाम करण्यात करून ७ इंच पाईप टाकण्यात आला. परंतु रात्री ११ वाजल्यापासून अद्याप ७ इंच पाईप सातत्याने ओसंडून वाहत आहे. हे पाणी बाहेर जाऊ नये. म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु सर्व उपाय व्यर्थ ठरले आहेत. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात भूजल पातळी खाली जाते. परंतु इथे मात्र पाणी भरभरून वाहत आहे.

लोकांना जमिनीतील पाणी वर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. परंतु इथे मात्र हा स्रोत आता थांबविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भूगर्भतज्ज्ञांनाही बोलावले जाणार आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे हे पाणी गरम आहे. त्यामुळे हे गंधकाचे पाणी आहे, असा अनेक जण दावा करीत आहे. काही जणांनी पाण्याची चव घेतली असता सर्वसाधारण पिण्याच्या पाण्याची चव आहे.

बोअरवेलच्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की जवळच असलेल्या नदीत हा प्रवाह जात असल्यामुळे सुकलेल्या
नदीत पाणीच पाणी दिसत आहे. यामुळे भुगर्भातील जलाशयाची पातळी, आजूबाजूच्या पाण्याचे स्रोत यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.

Web Title: Borewell water doesn't stop ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.