अन् रत्नागिरीतील समुद्रकिनारे झाले स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 06:56 PM2021-02-19T18:56:57+5:302021-02-19T18:59:27+5:30

Swachh Bharat Abhiyan Ratnagiri- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी लाडघर (ता. दापोली), वाडावेत्ये, कशेळी (ता. राजापूर) आणि भाट्ये (ता. रत्नागिरी) या ठिकाणी संबंधित कंपनींच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भाट्येच्या समुद्रकिनाऱ्याची जबाबदारी असलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने जिल्हाधिकारी मिश्रा तसेच तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या उपस्थितीत हा किनारा स्वच्छ करण्यात आला.

The beaches in Ratnagiri became clean | अन् रत्नागिरीतील समुद्रकिनारे झाले स्वच्छ

अन् रत्नागिरीतील समुद्रकिनारे झाले स्वच्छ

Next
ठळक मुद्देअन् रत्नागिरीतील समुद्रकिनारे झाले स्वच्छग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या कंपनीकडे व्यवस्थापनाची जबाबदारी

रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी लाडघर (ता. दापोली), वाडावेत्ये, कशेळी (ता. राजापूर) आणि भाट्ये (ता. रत्नागिरी) या ठिकाणी संबंधित कंपनींच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भाट्येच्या समुद्रकिनाऱ्याची जबाबदारी असलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने जिल्हाधिकारी मिश्रा तसेच तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या उपस्थितीत हा किनारा स्वच्छ करण्यात आला.

२०१४ साली मोदी सरकारने देशभरात स्वच्छता अभियानाची घोषणा केली. तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख सागरकिनाऱ्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या कंपनीकडे दिली होती. या मोहिमेला ग्रामस्थांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

मात्र, त्यानंतर या कंपन्यांचे या किनाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. पर्यटकांकडून या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता झाली होती. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर बैठक घेऊन स्वच्छता मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्या त्या कंपनीच्या, तसेच ग्रामपंचायतींच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने प्रमुख समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम सुरू केली.

रत्नागिरीनजीकच्या भाट्ये किनाऱ्याची जबाबदारी फिनोलेक्स कंपनीकडे आहे. त्यानुसार ही कंपनी आणि भाट्ये ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने गुरुवारी या किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा, तहसीलदार जाधव, फिनोलेक्स कंपनीचे कर्मचारी, अधिकारी, तसेच भाट्येचे सरपंच भाटकर तसेच सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

अशी आहे जबाबदारी
आंबोळगड, वेल्ये - अणुऊर्जा कंपनी, भाट्ये - फिनोलेक्स, पांढरा समुद्र ते मिऱ्या : जे. के. फाईल्स, काळबादेवी : गद्रे मरीन, गणपतीपुळे, मालगुंड : जेएसडब्ल्यू, मांडवी बीच ते गुढेवठार : अल्ट्राटेक, कुर्ली ते कसोप : फिनोलेक्स, आरे - वारे, भंडारपुळे : आंग्रे पोर्ट, वेळणेश्वर : रत्नागिरी गॅस पॉवर. मुरूड आणि कर्दे : एक्सेल कंपनी, लोटे, लाडघर बीच : घरडा, केळशी, उटंबर बीच : आशापुरा माईन कंपनी, वेळास : इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक, गावखडी व पूर्णगड : एन्व्हॉर्मेंटल फोरम ऑफ इंडिया, पुणे

Web Title: The beaches in Ratnagiri became clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.