प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वेतोपरी मदतकार्य - सुनील चव्हाण  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 07:44 PM2019-08-08T19:44:54+5:302019-08-08T19:45:06+5:30

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली.

Assistance from the Administrative Institutions -Sunil Chavan | प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वेतोपरी मदतकार्य - सुनील चव्हाण  

प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वेतोपरी मदतकार्य - सुनील चव्हाण  

Next

रत्नागिरी - गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. सोबतच आता रोगराई पसरु नये, याची खबरदारी घेतली जात आहे. शक्य तितक्या पात्र व्यक्तींना तातडीची मदत प्रशासनाने दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
जुलै  महिन्याच्या प्रारंभी पावसामुळे चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून भेंदवाडी गाव वाहून गेले होते. यासह आतापर्यंत २८ व्यक्तींचा पूरात मृत्यु झाला आहे. इतर अपघातात एकजण मरण पावला एकूण २९ पैकी पात्र ठरलेल्यांची संख्या २४ असून त्यापैकी  २२ जणांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत पुरविण्यात आली आहे. या पावसात १५९ जनावरे वाहून गेली तर ७६३ घरांचे नुकसान झाले आहे. सर्व मालमत्तेचे आतापर्यंत झालेले नुकसान १० कोटी २८ लाख रुपये  असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हयात ३ मोठी धरणे असून ती पूर्णपणे सुरक्षित आहेत तसेच ४६ लघूप्रकल्प असून ते सर्व सुरक्षित आहेत. मृदसंधारण अंतर्गत १६ धरणे असून त्यापैकी ९ पूर्णपणे सुरक्षित असून असुरक्षित वाटणाºया ७ प्रकल्पातील पाणीसाठा कमी करुन त्यांनाही या पातळीवर आणण्याचे काम प्रशासनाने केले असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

पुरानंतर आजार पसरण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय सुरु आहेत. याबाबत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. चिपळूण, खेड तसेच  रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पावसाळ्यातील आपत्ती काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील नियंत्रण केंद्रातून अहोरात्र (२४ तास) परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या सर्व काळात महसूल, पोलीस तसेच इतर यंत्रणांनी उत्तम काम केले असून त्यांचे आपण कौतुक करतो, असे  जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
 
महामार्ग बंदची समस्या
यंदाच्या पावसाळयात चिपळूणमधील वाशिष्टी नदीला पूर आल्याने १० वेळा तर खेड जवळ जगबुडी नदीला पूर आल्याने १३ वेळा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली. राजापूर तालुक्यात अर्जुना नदीच्या पूराची पातळी वाढल्याने कोदवली पुलावरील वाहतूक ११ वेळा बंद झाली. जगबुडीची नदीची पातळी ९.५ मीटरपर्यंत वाढल्याची नोंद या काळात झाली. २०१६ साली याठिकाणी सर्वाधिक ११.३ मीटर  पातळीची नोंद झाली होती.
 
जमिनींना भेगा
सतत मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडण्याचा घटना या काळात मोठया प्रमाणात घडल्या. गुहागर आणि दापोली तालुके वगळता इतर तालुक्यात २६ ठिकाणी जमिनीला भेगा गेल्या आहेत.

Web Title: Assistance from the Administrative Institutions -Sunil Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.