कोकण मार्गावर ही रेल्वे काय घेऊन येणार याचीच उत्सुकता¨; रत्नागिरी स्थानकावर बुधवारी पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:57 PM2020-05-05T12:57:41+5:302020-05-05T13:03:34+5:30

ही गाडी रामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भारूच, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली, मडगाव जंक्शन, उडपी, मेंगळूर जंक्शन, कन्नूर, केलीकट, शोरनूर जंक्शन, त्रिसूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्याम, कोल्लम जंक्शन या स्थानकांवर व्यावसायिक थांबा घेणार आहे.

Another special parcel train will run on the Konkan railway line | कोकण मार्गावर ही रेल्वे काय घेऊन येणार याचीच उत्सुकता¨; रत्नागिरी स्थानकावर बुधवारी पोहोचणार

कोकण मार्गावर ही रेल्वे काय घेऊन येणार याचीच उत्सुकता¨; रत्नागिरी स्थानकावर बुधवारी पोहोचणार

Next
ठळक मुद्देआपण रत्नागिरी, कणकवली, मडगाव जंक्शन, उडपी या स्थानकावरील पार्सल आॅफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. स्थानकावर पार्सल स्वीकारणार

रत्नागिरी : कोकणरेल्वे मार्गावर अजून एक विशेष पार्सल ट्रेन ओखा ते तिरुवनंतपुरम अशी धावणार आहे. ही गाडी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने धावणार आहे. या ट्रेनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाणार आहे. ही गाडी मंगळवारी ओखा येथून दुपारी १.१० वाजता सुटणार आहे.

ही गाडी ६ मे रोजी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर सकाळी ११.१० वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर कणकवली स्थानकावर १.४० वाजता, मडगांव जंक्शन स्थानकावर ४.५० वाजता आणि उडपी स्थानकांवर रात्री ९.१० वाजता येणार आहे. ही गाडी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी ७ मे रोजी दुपारी १२ वाजता येणार आहे. तसेच या गाडीची परतीची गाडी नं. ००९३४ ही तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरून ७ मे रोजी रात्री ११ वाजता सुटेल व ८ मे रोजी उडपी स्थानकावर दुपारी १.२०, मडगांव जंक्शन स्थानकावर सायंकाळी ६.१० वाजता, कणकवली स्थानकावर रात्री ८.५० वाजता, रत्नागिरी स्थानकावर ११.१० वाजता येणार आहे. ही गाडी ओखा स्थानकांवर तिसºया दिवशी ९ मे रोजी रात्री ९.४० वाजता पोहोचणार आहे.

ही गाडी रामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भारूच, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली, मडगाव जंक्शन, उडपी, मेंगळूर जंक्शन, कन्नूर, केलीकट, शोरनूर जंक्शन, त्रिसूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्याम, कोल्लम जंक्शन या स्थानकांवर व्यावसायिक थांबा घेणार आहे. या स्थानकांवर जर आपल्याला आपले पार्सल पोहोचवायचे असल्यास आपण रत्नागिरी, कणकवली, मडगाव जंक्शन, उडपी या स्थानकावरील पार्सल आॅफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

 

Web Title: Another special parcel train will run on the Konkan railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.