Anna Naik will return painting controversy complaint of NCP Youth Congress | "अण्णा नाईक परत येणार...", कोकणात घराघरावर केलेलं पेंटिंग वादात; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तक्रार

"अण्णा नाईक परत येणार...", कोकणात घराघरावर केलेलं पेंटिंग वादात; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तक्रार

'रात्रीस खेळ चाले' या मलिकेचा तिसरा भाग सध्या एका चॅनेलवर येत आहे. मात्र या निमित्ताने सावंतवाडी सह जिल्हयातील काहि भागात या मलिकेच्या प्रसिद्धीसाठी वेगळाच फंडा वापरण्यात आला असून, त्याला आता युवक राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. या मलिकेच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक घरावर तसेच सार्वजनिक मालमत्तेवर अण्णा नाईक परत येत आहे. अशा प्रकारचे पेंटिग करण्यात आले आहे. यालाच विरोध म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतासावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांंना निवेदन देण्यात आले आहे.

हे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सदस्य अर्षद बेग,युवक शहरअध्यक्ष अभिजीत पवार,सदस्य परेश तांबोस्कर,इम्रान शेख, प्रतीक सावंत, शेलटन नरोना,दीपक पाटकर,सोहेल शेख व तालुक्यातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिले आहे.

यावर रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा येत आहे.याबद्दल सगळ्यांना आनंद आहे.पण त्या मालिकेची जाहीरात ही चुकीच्या पध्दतीने केली जात आहे.असा आक्षेप राष्ट्रवादी युवक कॉगे्रसच्या वतीने नोदवण्यात आला आहे.अण्णा परत येत आहे असे पेंटिग सर्वत्र लावण्यात आले आहे.यामध्ये सार्वजनिक मालमत्ता तसेच खासगी मालमत्ता ही सोडण्यात आली नाही.असा आरोप ही यावेळी करण्यात आला आहे. सदर पेटिग वर कारवाई करा सार्वजनिक ठिकाणी करण्यासाठी आपल्या कार्यालया कडून परवानगी घेतली नसल्यास उचित ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.यावर आपण स्वता यात लक्ष घालू असे यावेळी म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने घेतलेल्या आक्रमक पवित्र्या मुळे पुन्हा एकदा रात्रीस खेळ चाले ही मालिका वादात सापडल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Anna Naik will return painting controversy complaint of NCP Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.