वित्त आयोगाच्या व्याजावरही डल्ला, विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:37 PM2020-06-27T15:37:31+5:302020-06-27T15:38:30+5:30

चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवरील व्याज आणि तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी शासनाने जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे सुमारे एक कोटी रुपये परत करावे लागणार आहेत़ गावच्या विकासाचा निधी परत जाणार असतानाच व्याजाची रक्कमही शासनाने परत घेतल्याने ग्रामपंचायतींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़.

Also rely on the interest of the Finance Commission | वित्त आयोगाच्या व्याजावरही डल्ला, विकासाला खीळ

वित्त आयोगाच्या व्याजावरही डल्ला, विकासाला खीळ

Next
ठळक मुद्देवित्त आयोगाच्या व्याजावरही डल्ला, विकासाला खीळचौदाव्या वित्त आयोगाचा निधीही परत मागितला

रत्नागिरी : चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवरील व्याज आणि तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी शासनाने जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे सुमारे एक कोटी रुपये परत करावे लागणार आहेत़ गावच्या विकासाचा निधी परत जाणार असतानाच व्याजाची रक्कमही शासनाने परत घेतल्याने ग्रामपंचायतींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़.

कोरोनामुळे शासनाच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे़ त्यामुळे शासन आर्थिक अडचणीत सापडले असल्याने तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगातून शासनाकडून निधी दिला जातो़ त्यासाठी प्रत्येक गावचा आराखडा तयार करून तो जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सादर करण्यात येतो़

शासनाने यावर्षी गावागावात कोरोना प्रतिबंधासाठी होमिओपॅथिक औषधे वाटण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना आदेश काढले आहेत़ या औषधांच्या खरेदीसाठी ग्रामपंचायतस्तरावर शिल्लक असलेला तेराव्या वित्त आयोगातील अखर्चित निधी आणि चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचे व्याज सरकारने जमा करण्याचे आदेश दिले होते़ हा निधी शासनाच्या खात्यावर ग्रामपंचायतींना जमा करावा लागणार आहे़

या आदेशाबाबतची सूचना पंचायत समिती गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. आर्थिक दृष्ट्या आधीच गरीब असलेल्या ग्रामपंचायतींकडे निधी परत मागण्यात आल्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होणारा गावचा विकास रखडणार आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे़

Web Title: Also rely on the interest of the Finance Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.