बेनी धरणाजवळ अपघात; बस झाडाला अडकल्याने मुलं आणि प्रवासी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 10:33 PM2022-08-15T22:33:29+5:302022-08-15T22:35:34+5:30

गाडी थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी व प्रवाशांना गाडीतून सुरक्षित काढण्यात आले. मात्र गाडी अधांतरी असल्याने ती काढण्यासाठी एस. टी. चे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

Accident near Beni Dam; As the bus stuck to a tree, the children and the passengers escaped | बेनी धरणाजवळ अपघात; बस झाडाला अडकल्याने मुलं आणि प्रवासी बालंबाल बचावले

बेनी धरणाजवळ अपघात; बस झाडाला अडकल्याने मुलं आणि प्रवासी बालंबाल बचावले

googlenewsNext

लांजा : लांजाहून वाडगावला जाणाऱ्या बसचा बेनी धरणानजीकअपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने धरणाच्या पाण्यात कोसळली नाही आणि बसमधील मुले आणि प्रवासी बालंबाल बचावले. मात्र या बसची धडक एका रिक्षाला बसल्याने रिक्षाचालक जखमी झाला आहे.

लांजा बसस्थानकातून दुपारी १ वाजता ही बस विद्यार्थी व प्रवासी यांना घेऊन निघाली. स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन आटोपून जवळजवळ २५ ते ३० विद्यार्थी या बसने (एमएच १४ बीटी ३००५ ) निघाले. त्यात काही अन्य प्रवासीही होते. दुपारी १.३० वाजण्याच्यादरम्यान बेनी येथे बसची रिक्षाला (एमएच ०८ के २५६५ ) धडक बसली. त्यामुळे एस. टी. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस साईटपट्टी सोडून शेजारी असलेल्या झाडाला अडकून थांबली. जर गाडी झाडाला अडकून थांबली नसती तर थेट धरणाच्या पाण्यात गेली असती. 

गाडी थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी व प्रवाशांना गाडीतून सुरक्षित काढण्यात आले. मात्र गाडी अधांतरी असल्याने ती काढण्यासाठी एस. टी. चे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Accident near Beni Dam; As the bus stuck to a tree, the children and the passengers escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.