रत्नागिरीच्या समुद्रात मासेमारी नौका बुडाली; ५ खलाशी बचावले, एक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:16 AM2019-08-15T11:16:34+5:302019-08-15T11:18:34+5:30

दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू

5 survived and 1 one missing after fishing boat sinks in ratnagiri | रत्नागिरीच्या समुद्रात मासेमारी नौका बुडाली; ५ खलाशी बचावले, एक बेपत्ता

रत्नागिरीच्या समुद्रात मासेमारी नौका बुडाली; ५ खलाशी बचावले, एक बेपत्ता

Next

रत्नागिरी : राजीवडा परिसरातील फणसोपकर यांची अलीना नामक मासेमारी नौका रत्नदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात मासेमारी करत असताना बुडाली. ही घटना आज  पहाटे ४ वाजता घडली. या नौकेवर ६ खलाशी होते. त्यापैकी ५ खलाशी वाचले असून तिघे जखमी झाले आहेत. 

दुर्घटनेतील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सोमेश्वर येथील पवार नामक खलाशी अद्याप सापडलेला नाही. किल्ल्यासमोर ८ फॅदम (वाव) खोल समुद्रात जाळे टाकलेले असताना पाण्याच्या तीव्र प्रवाहाने नौका किल्ला किनारी वाहून आली. योग्य वेळी नौकेचे इंजिन सुरू न झाल्याने ही घटना घडली.

Web Title: 5 survived and 1 one missing after fishing boat sinks in ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात