Corona vaccine- सरकारी रुग्णालयात मोफत खासगी ठिकाणी २५० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:02 PM2021-03-01T20:02:54+5:302021-03-01T20:04:35+5:30

Corona vaccine Ratnagiri- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. जिल्ह्यात २३ सरकारी रुग्णालये आणि ७ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयात मोफत, तर खासगी रुग्णालयामध्ये २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

250 in a private private hospital | Corona vaccine- सरकारी रुग्णालयात मोफत खासगी ठिकाणी २५० रूपये

Corona vaccine- सरकारी रुग्णालयात मोफत खासगी ठिकाणी २५० रूपये

Next
ठळक मुद्देसरकारी रुग्णालयात मोफत खासगी ठिकाणी २५० रूपयेज्येष्ठ नागरिकांना आजपासून लस, लसीकरणासाठी दर निश्चित

रत्नागिरी : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. जिल्ह्यात २३ सरकारी रुग्णालये आणि ७ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयात मोफत, तर खासगी रुग्णालयामध्ये २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात १६ जानेवारी रोजी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी, १ मार्चपासून दुसरा टप्पा सुरु करण्यात येत आहे. यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिक हे लस घेऊ शकतात.

लसीच्या एका डोसचे २५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. खासगी रुग्णालये शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारु शकत नाहीत. त्याबाबतची सूचना प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोना लस देण्याच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदिंना ही लस देण्यात आली होती. त्यावेळी डोस घेतल्यानंतर काहींना त्रासही झाला होता. त्यातील काहींनी दुसरा डोसही घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यातील लस देण्यासाठी आरोग्य विभागाने नोंदणीचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत २२,३३८ जणांनी त्यासाठी नोंदणी केली आहे.

नोंदणी कशी करणार?

कोेरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दुसऱ्या टप्प्यातील लस देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषद आरोग विभाग आणि जिल्हा शासकीय आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

पहिल्या टप्प्यातील लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील लस देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. त्यासाठी कोविड डॅश बोर्ड, आरोग्य सेतू या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन इच्छुक नोंदणी करीत आहेत.

कोणाला मिळणार लस

कोरोना लस कोणाकोणाला देता येईल हे शासनाने निश्चित केले आहे. दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून लस देण्याचे काम सुरु होत आहे. त्यासाठी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेले ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

पहिल्या टप्प्यातील दहा हजार बाकी

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, आशा, महसूलचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना लस देण्यात आली. त्यामध्ये पहिला डोस १४,८२७ जणांनी घेतला. त्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी देण्यात आला. दुसरा डोस ३२०४ जणांनी घेतला आहे. उर्वरित जणांना लवकरच हा डोस देण्यात येणार आहे.

सरकारी रुग्णालये
१) जिल्हा शासकीय रुग्णालय
२) कोकणनगर न. प. रुग्णालय
३) झाडगाव न. प. रुग्णालय
४) हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र
५) चिपळूण न. प. रुग्णालय
६) कामथे उपजिल्हा रुग्णालय
७) अडरे प्राथमिक आरोग्य केंद्र
८) खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र
९) कळंबणी उपजिल्हा रुग्णालय
१०) राजापूर ग्रामीण रुग्णालय
११) धारतळे प्राथमिक आरोग्य केंंद्र
१२) ओणी प्राथमिक आरोग्य केंद्र
१३) जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र
१४) मंडणगड ग्रामीण रुग्णालय
१५) गुहागर ग्रामीण रुग्णालय
१६) आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्र
१७) तळवली प्राथमिक आरोग्य केंद्र
१८) दापोली उपजिल्हा रुग्णालय
१९) आसूद प्राथमिक आरोग्य केंद्र
२०) साखळोली प्राथमिक आ. केंद्र
२१) संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय
२२) साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र
२३) लांजा ग्रामीण रुग्णालय

खासगी रुग्णालये
१) श्री रामनाथ हॉस्पिटल, रत्नागिरी
२) परकार हॉस्पिटल, रत्नागिरी
३) एसएमएस हॉस्पिटल, चिपळूण
४) वालावलकर हॉस्पिटल, चिपळूण
५) दिनदयाळ उपाध्याय हॉस्पिटल, लांजा
६) लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण

Web Title: 250 in a private private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.